Header Ads

  • ताजा खबरें

    नाताळ निमित्त बदलापुरच्या किलबिल प्रि स्कुल मध्ये"सैंटाक्लॉज"

    बदलापूरः- कुळगांव बदलापूर पूर्व शिरगांव येथील किलबिल प्रि स्कुल मध्ये नाताळ सण साजरा करुन चिमुकल्यांना नाताळ सणाची माहिती अतिशय मनोरंजनाच्या स्वरुपात देण्यात आली. दि. 22 डिसेंबर रोजी किलबिल प्रि स्कुल मध्ये अचानक सैंटाक्लॉजचे आगमन झाला व सर्व विद्यार्थ्यांना नाताळ समानिमित्त चोकलेट व गिफ्ट भेट देण्यात आले. सैंटाक्लॉजला पाहुन किलबिल प्रि स्कुलच्या सर्व विद्यार्थी आनंदी झाले. सैंटाक्लॉजकडुन भेट स्विकारुन "जिंगल बेल" या गाण्यावर चिमुकल्यांनी डान्स देखील केले.
    मुलांना प्रत्येक सणाची माहिती व्हावी तसेच जनजागृतीच्या उद्देशाने बदलापुर येथील किलबिल प्रि स्कुल मध्ये नाताळ सण साजरा करण्यात आला असे शाळेच्या संचालिका यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad