कंदोई फाऊंडेशन व आशिर्वाद हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर
अंबरनाथः- दि 13 जानेवारी रोजी कंदोई फाऊंडेशन व ऑशिर्वाद हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे भाजपा अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष डॉ. मनोज कंदोई यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
अंबरनाथ पूर्व बी-केबीन रोड येथील मोतीराम पार्क, धम्मदीप बुध्द विहार याठिकाणी सकाळी ठीक 11 वाजता शिभिराला सुरुवात होणार असुन अनुभवी डॉक्टरांकडुन आलेल्या नागरिकांचे डोळे तपासुन गरजवंतांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांच्या नेत्र तपासणीमध्ये मोतिबिंदू आढळणार अश्या रुग्णांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन देखील मोफत करण्यात येणार असल्याचे समजते. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच शिबिर यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. कंदोई यांनी केले.

No comments