भाजपा नगरसेवक संभाजी शिंदे आयोजित श्री दत्त जयंती जन्मोत्सव धुमधडाक्यात सम्पन्न
बदलापूरः- सालाबादप्रमाणे याहीवर्षी भाजपा बदलापूर शहराध्यक्ष व वार्ड क्र. 30 चे नगरसेवक संभाजी ज्ञानोबा शिंदे यांनी श्री दत्त जयंती जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दि. 21 डिसेंबर रोजी सायं. 7 वाजता सदगुरु कृपा भजनी मंडळ द्वारे भजन कार्यक्रम तसेच दि. 22 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता श्री दत्त जयंती जन्मोत्सव कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वार्ड क्र. 30 मधील भक्तगण श्री दत्त जयंती जन्मोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहुन दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बालाजी मित्र मंडळ, दत्तात्रय आर्केड रहिवाशी मंडळ व श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट च्या सभासदांनी भरपूर मेहनत घेतले. आलेल्या पाहुण्यांना व भक्तगणांना दर्शन घेतांना तसेच रांगेत उभे राहताना त्रास होऊ नये तसेच महाप्रसादाचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अतिशय उत्तमरित्या श्री दत्त जयंती जन्मोत्सव कार्यक्रम पार पाडल्याबद्दल भाजपा नगरसेवक शिंदे व त्यांच्या सहकार्यांचे भक्तांनी आभार मानले.


No comments