आज होणार कुळगांव बदलापूर (पू) रिक्षा चालक मालक संघटनेची निवडणुक
बदलापूरः- कुळगांव बदलापूर (पू) रिक्षा चालक मालक संघटनेकडुन मागील अनेक वर्षे कमिटीत भोंगळ कारभार होत असल्याने प्रकाश पेणकर यांनी कमिटी बदलण्याचा निर्णय घेतला असुन आज दि. 23 डिसेंबर रोजी रिक्षा चालक मालक संघटनेची निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी खरवई येथील रिक्षा चालक प्रकाश माणिक जाधव व किशोर रामचंद्र देशमुख उमेदवार म्हणुन निवडणुक लढवत आहेत.
मागील अनेक वर्ष सदर संघटना रिक्षा चालकांची समस्या सोडविण्यास असमर्थ ठरल्याने प्रकाश जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यकारीणीत बदल घडणार असुन प्रकाश जाधव यांनी सर्व रिक्षा चालक - मालकांना आव्हान केले आहे कि, सर्व रिक्षा चालक व मालकांनी बहुमताने त्यांना विजयी करावे. मतदान करण्यासाठी येतांना सोबत ड्राईव्हींग लायसेंस मुळ प्रत सोबत आणावे असेही आवाहन केले आहे.यंदा निवडणुकीत प्रकाश जाधव देखील अध्यक्षपदासाठी निवडणुक लढवत असुन त्यांनी वचननामा सुद्धा प्रकाशित केले आहे. त्या वचननामाप्रमाणे जर प्रकाश जाधव निवडुन आले तर अवैधरित्या बाहेरच्या परमीटच्या चालणार्या गाड्या बंद करण्यासाठी ते प्रयत्न करतील. बेकायदेशीर पणे चालणार्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येईल. सर्व चालक मालकांना रांगेत प्रवासी मिळावेत म्हणुन कमिटी कार्यरत राहील व रांगे व्यतिरिक्त भाडी भरणार्या चालक-मालकावर कारवाई करण्यात येईल. रिक्षास्टैंडला मुलभूत सुविधा जसे प्यायला पाणी, शौचालयची सोय उपलब्ध करण्याता प्रयत्न करणार. मुख्य रिक्षा स्टैंडला सीसीटीव्ही कैमरे लावले जातील जेणेकरुन कारवाई करणे सोप्पे जाईल. कार्यालय सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत चालु ठेवण्यात येईल. जेणेकरुन काही समस्या असल्यास ती लगेच मार्गी लावला येईल. सर्व रिक्षा चालक मालकांना 1 लाखाचा विमा देण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरुन कधी अपघात झाल्यास किंवा आजारपणात मदत होईल. रिक्षाचालक मालकांच्या मुलांसाठी विविध संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणुन शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर लावणार, त्यांना खेळात संधी मिळावी म्हणुन स्पर्धांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करणार. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेसोबत पत्रव्यवहार करुन रस्त्याच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत वेळोवेळी रिक्षा चालक मालक संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी आपल्या वचननाम्यात म्हटले आहे.
प्रकाश माणिक जाधव यांच्या दुरदृष्टी व चांगल्या उद्देशामुळे रिक्षा चालक मालक संघटनेच्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे रिक्षा चालकांमध्ये चर्चा आहे.


No comments