मिरची वाडी अंबरनाथ येथील आदिवासी भागात रुग्णमित्र भरत खरे यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या घेतल्या जाणून
अन्न सुरक्षा योजनेचा बोजवारा ; आदिवासी रोजगारा पासून वंचित
या पाड्यात वीज तर पोहचली पण याना वीज मंडळाने 25 हजार ते लाख रुपये प्रयन्त बिल माथी मारत असल्याने भीक नको पण कुत्रे आवर अशी अवस्था झाली आहे .काही आदिवासी बांधव यांनी गॅस घेतला पण 800 रुपये परवडत नसल्याने सिलेंडर तसेच पडून आहेत ,दुकानदार शिप वर शिक्का मारल्याने रॉकेल देत नाही परिणामी वनातील झाडे तोडून चुलीवर जेवण बनवत असल्याची माहिती महिलांनी दिली .शहरात धुनी भांडी ची कामे महिलांना मिळत नसून त्यांना भंगार गोळा करून त्यावर आपले गुजराण करत आहेत .शासनाने या आदिवासी बांधव च्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया रुग्णमित्र भरत खरे यांनी देऊन शासन दरबारी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले .सदर वेळी मदर होम संस्था चालक निर्मला बंगेरा ,पत्रकार खुशाल विसपुते ,गजानन तायडे,सुनीता तायडे आदी उपस्थित होते .

No comments