1 जानेवारी रोजी मुरबाडकर नववर्षोत्सव 2019 चे आयोजन
मुरबाड (बदलापूर विकास मिडिया)- नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने मुरबाडकरांसाठी 1 जानेवारी रोजी मुरबाडकर नववर्षोत्सव 2019 ते आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे राजेश पाटील व मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. शितल तोंडलीकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असुन प्रेक्षकांना नववर्षानिमित्त मनोरंजन करण्यासाठी उदय साटम संकल्पीत रंग तरंग कार्यक्रम होणार आहे. तसेच नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुरबाडकरांच्या भेटीला माझ्या नवर्याची बायको सिरीअलची सुप्रसिध्द अभिनेत्री राधिका व नृत्यांगना मानसी नाईक उपस्थिती लावणार आहे.
मुरबाड येथील खुले नाट्यगृह याठिकाणी रात्री 8.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असुन या धम्माल कार्यक्रमाचा मुरबाड मधील रसिकप्रेक्षकांनी आनंद घ्यावा असे आयोजक सौ. शितल तोंडलीकर यांनी बदलापुर विकास मार्फत आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांसोबतच उपनगराध्यक्षा सौ. अर्चना विशे, वैभव भोसले, किसन कथोरे, मोहन सासे, नारायण गोंधळी, नितीन तेलवणे, निता गडगे, उर्मिला ठाकरे, कस्तुरी पिसाट, विकास वारघडे, छाया चौधरी, साक्षी चौधरी, वैशाली शेळके, हमीद पानसरे, संतोष कोळेकर व भाजपा पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भरपूर मेहनत घेत आहेत.

No comments