मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत
कै. मारोतराव शिंदे जलतरण प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींची यशस्वी कामगिरी
18 जलतरणपटूंमध्ये अंध व गतिमं द प्रशिक्षणार्थींचा सहभाग, जलतरणपटूंसह प्रशिक्षकां वर
कौतुकाचा वर्षाव
ठाणे(18): मालवण चिवला बीच येथे 16 डिसेंबर रोजी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित 9 व्या राज्यस्तरीय ओपन सी स्विमिंग जलतरणस्पर्धेत प्रथमच ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे पोहण्याच्या सरावासाठी येत असलेले 18 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. विविध गटातसहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी 5 कि.मी, 2 कि.मी, 1 कि.मीचे सागरी अंतर यशस्वीरित्या पूर्ण करीत पदके प्राप्त केली. प्रथमच या सागरी जलतरण स्पर्धेतसहभागी झालेल्या जलतरणपटूंना उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, क्रीडाअधिकारी मिनल पालांडे यांचे मोलाचेसहकार्य व मार्गदर्शन लाभले.
ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे विविध गटातील नागरिक तसेच मुले सरावासाठी येत असतात. या ठिकाणी नियमित सरावासाठी येणाऱ्या मुलांना स्पर्धेत उतरवून त्यांचा उत्साह वाढवावा किंबहुना त्यांना विविध स्पर्धांसाठी प्रेरित करावे या हेतूने क्रीडाअधिकारी मिनल पालांडे यांच्यामार्गदर्शनाखाली व व्यवस्थापक चंद्रकांत शिंगळे यांच्या सहकार्याने नियमित सराव करीत असलेल्या प्रशिक्षणार्थींना या मालवण चिवला बीच येथे झालेल्याराज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध गटातून एकूण 18 स्पर्धक सहभागी झाले होते. 5 किलोमीटर स्पर्धेत अद्वैत गावडे, प्रशांतबटूळे, दिशांत बटूळे, वरद राजगोंड, सौरभ पंदिरकर, 3 कि.मी स्पर्धेत स्वयंम देसाई, पवन कदम, अयुष राणे, सोहम पाटील, भरत मोरे, 2 कि.मी स्पर्धेत100 टक्के अंध असलेला राजेश मेहता, 1 कि.मी स्पर्धेत अरूष अडसुळे, अथर्व पवार, ध्रुव कोळी, अपूर्व पवार, सायुज्य नाईक, लष्कर मोरे तर विशेषमुलांमध्ये अन्वय मेत्री, करण नाईक हे सहभागी झाले होते. या सर्व जलतरणपटूंनी आपले अंतर यशस्वीरित्या पार करीत पदके पटकाविली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशिक्षक नरेंद्र पवार, सुनिल हुले, सूर्यकांत कदम, अजित शिंदे, रावी काळे व राजाभाऊ पत्की, सतीशसकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठ्वपटू गिरीश शेट्टी यांनीही या जलतरणपटूंना शुभेच्छा दिल्या. तसेच कोकण पदवीधर संघाचे आमदार व ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी या स्पर्धकांना चिवला बीच येथे जावून शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या कै.मारोतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सरावासाठी येणारे प्रशिक्षणार्थी हे प्रथमच अशाप्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्याने सर्व पालकांनी प्रशिक्षकांचे व महापालिकेच्या अधिका-यांचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments