अनधिकृत फेरीवाले,हातगाड्या,बँनरवर महापालिकेची धडक कारवाई
मुंब्रा प्रभाग समितीतील ७५ स्टॉल,२७ ठेले,२० हातगाड्या यांच्यासह 40 डिजिटल बॅनर जप्त
ठाणे:- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत मुंब्रा प्रभाग समिती तसेच कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील जवळपास ७५ स्टॉल, ८७ बाकडी,२७ ठेले तसेच २० हातगाड्या जप्त करण्यात आल्या तर 40 अनधिकृत डिजिटल बॅनर जप्त करण्यात आले.
त्या कारवाई अंतर्गत मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील चाँद नगर,तनवर नगर, कब्रस्तानरोड इद्यादी परिसरातील ७५ स्टॉल, ८७ बाकडे, ५६ प्लास्टिक बांबूशेड, ३७ ठेले तोडण्यात आले. या परिसरातील 40 डिजिटल बँनरसह २० हात गाड्या जप्त करत अनधिकृत सर्विस स्टेशनचे साहित्य जप्त करण्यात आले.त्याचबरोबर कळवा प्रभाग समितीतील 15 प्लास्टिक बांबूशेड,7 लोखंडी टपऱ्या व 10 हातगाड्या जप्त करण्यात आल्या .
सदरची कारवाई मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर तसेच कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव यांच्या मागर्दर्शनाखाली महापलिकेच्या अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. यापुढे ही शहरातील अनधिकृत फेरीवाले,हातगाड्या व बॅनरवर महापलिकेच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.
No comments