महाराष्ट्र राज्यातील उल्हासनगर शहराच्या प्रथम नागरिक म्हणतात, "मला मराठी येत नाही, हिंदीत बोला"
उल्हासनगरः- सिंधुनगरी म्हणुन ओळखले जाणारे उल्हासनगर शहरात पुन्हा एखदा सिंधी भाषीय राजकारणी कशाप्रकारे मराठी भाषा येत नसले तरी 60 टक्के हुन जास्त मराठी लोकवस्त असलेल्या उल्हासनगर शहरात आपले राजकिय अस्तित्व टिकवुन आहेत हे दिसुन आले. मागील आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या महासभेत जेव्हा उमपाच्या महापौर पंचम कलानी कोणतेही संकोच न बाळगता नगरसेवकांना सुचना करतांना भर महासभेत म्हणतात कि, मला मराठी येत नाही, हिंदीत बोला.
सदर महासभेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर आल्यानंतर काहीच मिनीटात व्हायरल झाले व उमपाच्या महापौर तसेच काही सिंधी राजकारण्यांच्या मनात मराठी भाषा शिकण्याची तीळमात्र ही इच्छा नसल्याचे दिसुन आले.
महापौर पंचम कलानी ह्यांनी मला मराठी येत नाही हिंदीत बोला हे म्हणतापुर्वी थेडे विचार करायला हवे होते. त्या आज उल्हासनगर महापालिकेच्या महापौर आहेत म्हणजेच काय तर उल्हासनगर शहराच्या त्या प्रथम नागरिक आहेत. ज्या मराठी मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना मतदान करुन निवडून दिले, ज्या महाराष्ट्र राज्यातील उल्हासनगर शहरात त्या लहानपणापासुन राहतात त्या माय मराठी राज्यात त्यांनी इतकी वर्षात कधी मराठी शिकणे गरजेचे आहे असे त्यांना कधी का वाटले नाही असा प्रश्न उल्हासनगरकर विचारत आहेत.
महापौरांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सुर उमटत असल्याचे समजते.

No comments