Header Ads

  • ताजा खबरें

    भाजपा नेत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री सावित्रीबाई फुले भवनसाठी राखीव असलेले भुखंड हडपल्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टी आक्रमक

    उल्हासनगर महापालिकेसमोर आमरण उपोषण

    उल्हासनगरः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री सावित्रीबाई फुले भवनसाठी राखीव असलेल्या उमपा क्षेत्रातील प्लॉट क्र. 705 च्या शासकिय भुखंडाला भाजपा पक्षाच्या नेत्याने हडप केल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टी उल्हासनगर शहरच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले.
    उमपा मुख्यालयासमोर आज दि 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आमरण उपोषण करण्यात आले असुन पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष उ. शहर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उपाध्यक्ष संजय (काका) निकम, पीरिपाटीर्चे141 विधानसभा अध्यक्ष दिपक खोब्रागडे, सचिव सुजित सुतार, उपाध्यक्ष पांडुरंग शिंगे, युवा कार्यकर्ता सुनिल निकम व राष्ट्रीय मजदुर सेना उल्हासनगर शहराचे राजेश आमटे या सहा जणांनी आमरण उपोषण केले आहे.
    पक्षाचे सर्वेसर्वा जोगेंद्र कवाडे यांनी देखील उपोषण स्थळी उपोषणकर्तांना भेट दिली. सायंकाळी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर व इतर राजकीय पुढारी, पदाधिकार्यांनी देखील उपोषणकर्त्यांना भेट दिल्याचे समजते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad