Header Ads

  • ताजा खबरें

    सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात कु. सई विनीत जोशीला राजगायिका होण्यासाठी वोटिंग करा : भाजपा नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे यांचे बदलापूरकरांना आव्हान

    बदलापूर:- कलर्स चॅनेल वरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या फायनल मध्ये बदलापूर येथील रहिवाशी बदलापूरची शान कु. सई  विनीत जोशीची फायनल मध्ये निवड झाली आहे. तिची निवड झाल्याची माहिती मिळताच बदलापूर मधील संगीतप्रेमी, राजकीय नेते मंडळी, समाजसेवक, कलाकार व रहिवाश्यांनी कु. सई  विनीत जोशी हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून ज्याप्रमाणे सईने आपल्या कलेचे सादरीकरण करून परीक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकले अगदी त्याच परिश्रमाने सई फायनल ही जिंकून राजगायिका होणार असे बदलापूरकरांना विश्वास आहे.
    भाजपा पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सौ. हर्षदा रमेश सोळसे यांनी कु. सई विनीत जोशी हिला फायनल मध्ये निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या असून बदलापूरमधील प्रत्येकाने बदलापूरची शान कु. सई जोशी हिला "राजगायिका" होण्यासाठी तिला जास्तीत जास्त वोटिंग करावे असे आव्हान देखील केले आहे. वोटिंग लाईन १७ डिसेंबर २०१८ रात्री ९.३० पासून सुरु झाले असून बदलापूर मधील सर्व संगीत प्रेमी व नागरिकांनी व्हुट ऍप द्वारे किंवा www.voot.com या वेबसाईटवरून थेट वोट करावे अशी विनंती व आव्हान सौ. सोळसे यांनी केले आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad