ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजना व स्टेम वॉटर डिस्ट्री अँण्ड इन्फ्रा कंपनी यांनी पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहरास होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 26 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 6.00 ते गुरुवार दिनांक 27 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 12.00 पर्यत एकुण 30 तास बंद राहणार आहे.
यामुळे शहरातील घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा, पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर,जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर व कळव्याचा काही भाग इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

No comments