Header Ads

  • ताजा खबरें

    नगरसेवक अरुण सुरवळ यांच्या प्रयत्नाने शिरगांव गणपती मंदिर कातोडवाडी ते कृष्णा रिजेंसी रस्त्याच्या कामाला सुरुवात

    स्थानिक रहिवाश्यांच्या उपस्थितीत कामाचे भुमिपुजन सम्पन्न
    बदलापूरः- कुळगांव बदलापूर नगरपालिके क्षेत्रातील शिरगांव गणपती मंदिर कातोडवाडी ते कृष्णा रिजेंसी रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासुन दैयनिय अवस्था होती. नागरिकांना व वाहन चालकांना या खराब रस्त्यावरुन वाट शोधुन जातांना भरपूर त्रास होत होते, या समस्येकडे दक्ष देत स्थानिक नगरसेवक अरुन सुरवळ यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करुन लवकरात लवकर रस्त्याच्या काम सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. 
    प्रशासकिय पाठपुरावा आणि कामाची निविदा व इतर प्रक्रिया पुर्ण झाल्याने शिरगांव गणपती मंदिर कातोडवाडी ते कृष्णा रिजेंसी पर्यंत रस्ताच्या कामाला सुरुवात झाली असुन काल नगरसेवक सुरवळ यांनी परिसरातील रहिवाश्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या तसेच रहिवाश्यांच्या हस्ते नारळ वाढवुन रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन केले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad