मासा गळाला लावण्याचा विचार करण्यापेक्षा उमेदवार बदलले तरी शिवसेनेचा आमदार होऊ शकतो -सेना कार्यकर्त्यांचे मत
बदलापूरः- नुकताच शिवसेना बदलापूर शहर शाखेच्यावतीने आयोजित मुरबाड विधानसभा क्षेत्रातील "कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा" पार पडला. या मार्गदर्शन मेळाव्यात बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आपल्या भाषणात "शिवसेना पक्षश्रेष्ठींनी तो मासा गळाला लावला तर आमदारकी, खासदारकी व इतर पदे शिवसेनेला मिळविण्यास सोपे जाईल" असे आमदार किसन कथोरे यांना उद्देशुन विधान केले. वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्यामुळे कट्टर शिवसैनि नाराज झाल्याचे समजते.
![]() |
| वामन म्हात्रे, शिवसेना बदलापूर शहरप्रमुख |
आता वामन बारकु म्हात्रे यांच्यात आमदारकी लढविण्याची क्षमता राहिली नाही ज्यामुळे ते स्वतः आमदार पदासाठी दुसर्या पक्षातील उमेदवारांला आयात करुन तिकीट देण्यासाठी नाव सुचवत आहेत हे आता बदलापुरातील शिवसैनिकांना कळुन चुकले. शिवसेनेला मुरबाड विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी उमेदवार आयात करावा लागतोय हे जेव्हा शहरप्रमुख म्हात्रे स्वतः न संकोचता आपल्या भाषणात सांगतात हे ऐकल्यावर शिवसेना पक्षाची ताकद बदलापूर शहरात कमी होत आहे की काय असा कट्टर सैनिकांना मोठा प्रश्न पडला आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी व कट्टर कार्यकर्ते यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले कि,
"आजही बदलापूर शहरात शिवसेना पक्ष मजबुत करण्यासाठी व पक्ष वाढवण्यासाठी आमच्यासारखे तळागळातील कार्यकर्ते निस्वार्थ पणे दिवस रात्र प्रयत्न करत असतो व खूप परिश्रम घेत असतो. मुळात पक्षश्रेष्ठींनी उमेदवार आयात केले तरच मुरबाड विधानसभेत शिवसेनेला विजय मिळवता येईल असे आम्हा शिवसैनिकांना आजीबात वाटत नाही. एखाद्या कंपनीचा ठराविक एक प्रोडक्ट जर कालांतराने खराब ("डिफेक्टीव्ह") झाला असेल तर म्हणुन दुसर्या कंपनीच्या मालकाकडे कंपनी सोपविण्यापेक्षा त्या खराब (डिफेक्टीव्ह) प्रोडक्ट ला बाजुला ठेऊन क्षमता असलेल्या नवनव्या प्रोडक्ट ला लॉंच केल्यास कंपनीचे अस्तीत्व टिकु शकते. अस्तित्वच काय तर भविष्यात पुर्वीपेक्षा जास्त प्रगतीशील देखील होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे वामन बारकु म्हात्रे यांच्यात जर आमदार की लढविण्याची क्षमता नाही किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्रात त्यांची लोकप्रियता कमी झाल्याने त्यांना मतदारांचा कौल मिळत नसेल तर त्याच पक्षातील दुसर्या कार्यकर्ताला संधी दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले."
शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाने बदलापूर विकासशी बोलतांना अशी प्रतिक्रिया दिली कि,
"आज सेनेच्या तिकीटावर मुरबाड विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी पक्षातील अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी आपली तैय्यारी दाखवत आहे, विशेष म्हणजे त्यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रात सेनेचे काम देखील धुमधडाक्यात सुरु केले आहे. अनेक वर्षांपासुन पक्षवाढवण्यासाठी निःस्वार्थपणे काम करणार्या कट्टर शिवसैनिकांना डावलुन उमेदवार आयात केल्यास बदलापुरातील सैनिकांमध्ये पक्षाबद्दल असलेले मान आणि सन्मानास तडा जाऊ शकतो याची पक्षप्रमुखांनी नोंद घ्यावी. म्हणुनच अश्या कट्टर शिवसैनिकांना न डावलता एकदा संधी द्यावे. तसेच अकार्यक्षम माजी उमेदवाराचा "आयात करण्याचा सल्ला" पक्षश्रेष्ठींनी धुडकावुन लावावा."
शिवसेना सर्वेसर्वा मा. उध्दवजी ठाकरे, पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सध्या मुरबाड विधानसभा क्षेत्रात शिवसेने पक्षाच्या कट्टर उमेदवाराला तिकिट देण्याबाबत स्वतः प्राथमिकतेने विचार करावा असेही बदलापुरातील शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले आहे.
आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
- Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
- MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
- Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
- Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
- Finally, the campaign against anti-encroachment began...
- Nationalist party to observe indefinite hunger strike...
- ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
- Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...
आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
- Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
- MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
- Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
- Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
- Finally, the campaign against anti-encroachment began...
- Nationalist party to observe indefinite hunger strike...
- ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
- Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...


No comments