कु.ब.न.प. (शिक्षण विभाग) आयोजित वार्षिक क्रीडामहोत्सव 2018
बदलापुरः- विविध खेळ, त्यांची माहिती, खेळांचा थरार, नेतृत्व गुण, खेलाचे कौशल्य, खिलाडूवृत्ती व विजयाचा जल्लोष यांचा प्रतय्क्ष अनुभव कु..न.प. अखत्यारितील 16 शाळांतील विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कु.ब.न.प. (शिक्षण विभाग) आंतरशालेय वार्षिक क्रीडामहोत्सवाचे आयोजन एरंजाड शाळा येथील भव्य पटांकणावर करण्यात आले होते.
आंतरशालेय वार्षिक क्रीडामहोत्सव 2018 ला दि. 18 डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली व 21 डिसेंबर असे चार दिवसांचे क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वैयत्किक तसेच सांघिक खेळांचा थरार व आनंद घेण्यासाठी बदलापुर शहरातील क्रीडा रसिकांनी हा महोत्सवात उपस्थित राहुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
विद्यार्थांकरिता चमचा लिंबू, तीन पायाची शर्यत, धावणे, दोरी उडया, बॅडमिंटन हे वैयक्तिक खेळ व कबड्डी, खो-खो, लंगडी, डॉज बॉल हे सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसाय महोत्सवात विद्यार्थांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अल्पपहार, भोजन, प्रथमोपचाक, खेळाचे साहित्य,
ट्रॉफ्या व बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

बक्षिस वितरण समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी शिसवेनेचे नगरसेवक व भावी शहरप्रमुख शैलेश केसरीनाथ वडनेरे, नगरसेविका सौ. तनुजा गोळे, सौ. नेहा आपटे व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांना अधिकारी जडये व शाळेच्या प्राध्यापिका यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

No comments