तरुणांनो वाहनाच्या वेगाला आवर घाला - जयपाल पाटील
अलिबाग - रस्त्यावरुन आपले दुचाकी वाहन चावितांना वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करा व अपघाताला सामोरे जाताना वाहनाच्या वेगाला आवर घाला असा संदेश आपत्ती व सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील यांनी आनंदीबाई सायन्स कॉलेज नागोठणे यांच्या श्रमसंस्कार शिबिरात सांगितले.
कॉलेजने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर वांगणी, मरुआई मंदिर सभागृहात आयोजित केले होते. यावेळी जयपाल पाटील यांनी मुलामुलींना नवीन वाहन कायद्याची माहिती देत असता ५ मुली व २० मुलांकडे २ चाकी चालविता येते. मात्र त्यांच्याकडे वाहतुक परवाना नाही अशांना अपघात झाला तर ज्यांच्या नावावर वाहनाची नोंद असेल त्यांना ३ वर्षे सक्त मजूरी रुपये २५ हजार दंडाची नवीन नियमावली भारतात झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर साप, विंचू दंश, पाण्यात बुडाल्यावरील प्रात्यक्षिके, आपत्ती कायदा २००५ ची माहिती व अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिका कशी बोलवाल याचे प्रात्यक्षिकामध्ये १०८ पालीचे डॉ.राहुल यांनी माहिती दिली.
यानंतर जयपाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे आभार मानले. प्रारंभी कार्यक्रम प्रमुख प्रा. श्रीकृष्ण तुपारे यांनी जयपाल पाटील यांचे संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर व्याख्याने होवून २४ हजार नागरीकांना सुरक्षेचे धडे दिले आहेत. या शिबिरात १२० मुले-मुली, प्राध्यापक विकास शिंदे, प्रा. ज्योती प्रभाकर, प्रा. शितल टिके, प्रा. पुनम मुद्देबिहाळ असे उपस्थित होते.

No comments