कै. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय व बालविकास मंदिराचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सम्पन्न
बदलापुरः- शहर पूर्व दत्तवाडी येथील कै. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयचा पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ आज पार पडला. या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन बदलापुर शहराच्या प्रथम नागरिक शिवसेना नगरसेविका श्रीमती. विजया मोहन राऊत प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. संस्थेचे पदाधिकारी अध्यक्षा सौ. श्रीया जोशी व सिचव डॉ. सौ. श्रध्दा सोमण यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्या नंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि शब्दसुगनांनी करण्यात आले. आलेल्या मान्यवरांसाठी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. नगराध्यक्षा राऊत यांच्यासोबत त्यांच्या जाव शिवसेना नगरसेविका सौ. शितल प्रविण राऊत सुद्धा उपस्थित होत्या. उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच पारोतिषक वितरण करुन त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.
उद्या दि. 29 डिसेंबर रोजी कै. द्वरकाबाई गणेश नाईख विद्यालयच्या मालविकास मंदिर इयत्ता 1 ते 7 वी (प्राथमिक विभाग)चे पारितोषिक वितरण समारंभ असुन कात्रप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुखदा सुधीर जोशी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहे.
दोन दिवसीय पारितोषिक वितरण समारंभ यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रीया जोशी, सचिव डॉ. सौ. श्रध्दा सोमण, मुख्याध्यापिका सौ. सुनंदा कासार, सुनिल मोरे, मीनाक्षी अहिराव, शिक्षक प्रतिनिधी सौ. निशिगंधा विंव्दास, दशरथ कोर, नीरज दांडेकर व सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेत आहेत.


No comments