मुंब्रा प्रभाग समितीतील अनधिकृत बॅनर प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल ; महापालिकेची धडक कारवाई
ठाणे(बदलापुर विकास मिडिया):- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम,फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंब्रा प्रभाग समितीतंर्गत अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावणाऱ्या सात जणांविरुद्ध शहर विद्रूपीकरण कायद्यातंर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाई अंतर्गत मुंब्रा स्टेशन परिसर,अमृतनगर, किस्मत कॉलनी व तनवरनगर इद्यादी परिसरातील ८ बाकडी, २५ ठेले तसेच २२ हातगाड्या, २ ऊसाचा रसाच्या गाड्या,३ पानटपऱ्या व ५ मोटारसायकलवर देखील कारवाई करण्यात आली. किस्मत कॉलनी ते तनवरनगर पर्यंत बांधलेल्या ६३ शेड तोडण्यात आले.
या कारवाई बरोबरच मुंब्रा प्रभाग समितीमधील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम तीव्र केली जात असून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर देखील कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मागर्दर्शनाखाली सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात महापलिकेच्या अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. यापुढे ही शहरातील अनधिकृत फेरीवाले,हातगाड्या व बॅनरवर महापलिकेच्यावतीने कठोरपणे कारवाई करण्यात येणार आहे.
No comments