महासभा सुरु होण्याआधी नगरसेवकांना संभाषण मराठीत करण्यासाठी मनसेने पुष्पगु्च्छ देऊन केला आग्रह
उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- उल्हासनगर महापालिकेच्या महापौर सौ. पंचम कालानी यांनी नुकताच मला मराठी येत नाही, सिंधीत बोला असे बोलल्यामुळे त्यांच्या विरोधात मराठी वर्गाद्वारे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महापौरांना मराठी येत नाही असे जेव्हा संपुर्ण उल्हासनगर शहरात वार्यासारखे पसरु लागले त्यावेळी महापौर सौ. कालानी यांनी मी महासभेत गम्मत म्हणुन तसे म्हटले होते मला मराठी येते. मी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहे मराठीचे राजकारण कोणीही करु नये असे मेसेज सोशळ मिडियावर पोस्ट केले होते.
त्यानंतर मराठी मुद्दा शांत झाला असे कालानी यांनी वाटले असेल परंतु काल उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे मराठी भाषेत प्रशासकीय सर्व कामगाज करण्यात यावे अशी मागणी करुन महासभेसाठी आलेल्या सर्व नगरसेवक नगरसेविका व विशेष करुन महापौरांना पुष्पगुच्छ देऊन सर्वांना मराठीत बोलण्याचे व लिहण्याचे आग्रह करण्यात आले.
मनसेच्या पदाधिकार्यांनी सर्वांना पुष्पगुच्छ दिले असता सभागृहात जे नगरसेवक कधी सिंधी शिवाय दुसरी कुठली भाषा वापरण्याची इच्छा व्यक्त करत नव्हते ते आज मराठीत बोलायला लागले. बिट्टू सिंग व किशोर वनवारी हे दोन नगरसेवक वगळले तर उर्वरीत सर्व नगरसेवकांनी मनसेकडून पुष्पगुच्छ स्विकारुन मराठी भाषेत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, सभागृहात मराठीत बोलणार असे मान्य केले तसेच सभागृहाचे कामकाजही मराठीत सुरु करु असे ही प्रदिप रामचंदानी, डॉ. प्रकाश नाथानी, मनोज लासी, जिवन ईदनानी व इतर नगरसेवकांनी म्हटले. विशेष म्हणजे महापौर सौ. पंचम कालानी यांनी देखील मराठीत सर्वांना शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले.
सिंधी आणि हिंदीशिवाय ज्या सिंधी भाषिय नगरसेवकांचे कधी संभाषण होत नव्हते ते आज अतिशय छान पैकी मराठीत बोलल्याने "त्यांना मराठी भाषा तर येते पण ते बोलण्यासाठी प्रवृ्त करणारी मनसे स्टाईल लागते असे उल्हासनगर महापालिकेत मनसेच्या उपक्रमानंतर संपुर्ण शहरात चर्चा आहे.
No comments