Header Ads

  • ताजा खबरें

    ठाणे महापौर चषक 2018 जलतरणस्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंनी पटकाविली एकूण 35 पदके

    ठाणे, ता. 01 ः रहेजा येथील ठाणे क्लब येथे दिनांक 29 व 30 डिसेंबर रोजी झालेल्या ठाणे महापौर चषक 2018 च्या जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीच्या विविध गटातील जलतरणपटूंनी एकूण 11 सुवर्ण 13 रौप्य 11 कांस्य अशी पदके पटकावित 2 जलतरणपटूंनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. स्टारफिशच्या जलतरणपटूंनी संपूर्ण स्पर्धेत एकूण 35 पदके पटकावित पुन्हा एकदा आपली चमक दाखविली आहे. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन  झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास शिवसेना गटनेते दिलीप बारट्क्के, स्थानिक नगरसेविका मीनल संख्ये, नम्रता फाटक, रुचिता मोरे, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य व ठामपा परिवहन सदस्य राजेश मोरे आदी उपस्थित होते.
        दोन दिवस सुरू असलेल्या या जलतरणस्पर्धेत फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॉकस्ट्रोक, बटरफ्लाय या प्रकारात आदित्य घाग याने 4 सुवर्ण, 1 कांस्य, सवर अकुस्कर 1 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्य, वेंदात गोखले याने 1 सुवर्ण, विहान चतुर्वेदी याने 1 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य, मीर विरा 2 सुवर्ण व 2 कांस्य, ईदांत चतुर्वेदी याने 1 रौप्य, मानव मोरे याने 1 रौप्य, रोहन अंबुरे 1 कांस्य, आर्या गाडे 1 कांस्य, ऋग्वेद पाटील याने 1 रौप्य, 2 कांस्य, सानिका तापकीर 2 रौप्य, परीन पाटील 1 रौप्य व 3 कांस्यपदके पटकाविली. तर रिले या प्रकारात आठ वर्षीय गटात आदित्य घाग, रोहन अंबुरे, इशदात चतुर्वेदी, सोहम साळुंखे यांनी सुवर्ण तर 16 वर्षाखालील गटात ईशा शिंदे, सवर अकुस्कर, सानिका तापकीर, गार्गी शिटकर यांनी 1 कांस्यपदक पटकाविले. 16 वर्षाखालील गटात आशय दगडे, पृथ्वीराज कांबळे, ऋग्वेद पाटील, वेदांत गोखले यांनी कांस्यपदक पटकाविले. या सर्व जलतरणामधील 58 क्रीडाप्रकारात 35 पदके ही स्टारफिशच्या जलतरणपटूंनी पटकाविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या  सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक अतुल पुरंदरे व कैलाश आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad