Header Ads

  • ताजा खबरें

    खासदार श्रीरंग बारणे लिखीत ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे ३ जानेवारीला प्रकाशन

    नवी दिल्ली (बदलापुर विकास मिडिया), १ :  मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे  लिखीत  ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकाचे  प्रकाशन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते ३ जानेवारी २०१९ रोजी येथील  कॉन्स्टीट्युशन क्लब मध्ये होणार आहे.
                 केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा  मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते,  केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहीर,  सर्वश्री खासदार  शरद  पवार,   संजय राऊत,  आनंदराव अडसुळ  प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित राहणार आहेत.
            ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात लोकसभेच्या कामकाजा संदर्भातील खासदार श्री. बारणे यांचे अनुभव व काही संसद सदस्यांचे  मनोगत यांच्यासह संसदेच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
    पुस्तका विषयी  
    खासदार श्रीरंग बारणे पहिल्यांदाच मावळ लोकसभा मतदार  संघातून २०१४ साली लोकसभेत निवडून गेले या आगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वीस वर्षाचा अनुभव त्यांना होता. लोकसभेतील त्यांचे काम प्रभावी राहिले आहे. या सभागृहात त्यांनी अनेक प्रश्न मांडले. संसदेतील उत्तम  कामाबद्दल त्यांना चेन्नई येथील प्राईम पाँईट फांउडेशन यांच्या वतीने सलग चार वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संसदेतील त्यांचे अनुभव संसदेच्या कामाविषयी माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ‘मी अनुभवलेली संसद’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
                      लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहीली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी,  लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभसंदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री व संसद सदस्य असे १९  जणांनी आपले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत.  यापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘शब्दवेध’ , ‘समर्थ लढवय्या’ व ‘माझा वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ ही पुस्तके प्रकाशित केली असून हे पुस्तक संसदीय कामकाजाचा ठेवा ठरेल असे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad