वाईन शॉपच्या मालकाकडे कारवाई न करण्यासाठी 25 लाखाची मागणी : पैसे घेतांना अंटीकरप्शन ब्युरोची कारवाई
22 लाख लाच स्विकारतांना आनंद भोईर पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले ; अंधेरी एमआयडीसी येथील घटना
मुंबई (बदलापुर विकास मिडिया)- भ्रष्ट पोलिस अधिकार्यांच्या लाच घाण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे पुर्ण पोलिस खाते बदनाम होत असतांना अंधेरी एमआयडीसी गुन्हे प्रकटीकरण शाखा क्र. 10 चे पोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर या लाचखोर अधिकार्याला मुंबई अंटीकरप्शन ब्युरो ने रंगेहाथ पकडले आहे. अंधेरी एमआयडीसी येथील एका वाईन शॉप मालकावर गुन्हा नोंदविण्यात आले असुन गु. र. क्र. 22-2018, कलम 65, 41, 43, 90, 108 महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास न करण्यासाठी तसेच वाईन शॉपला केस मध्ये मदत करण्यासाठी म्हणुन वाईन शॉप मालकाजवळ 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी आनंद भोईर याने केली होती. वाईन शॉप मालकाने कंटाळुन मुंबई अंटीकरप्शन ब्युरोला तक्रार दिली व सापळा रचुन लाचखोर अधिकार्याला 22 लाख रुपये रोख रक्कम त्याच्या खाजगी वाहनात चालकासह स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आनंद भोईर व चालकाला अटक करण्यात आले असुन पुढील तपास मुंबई अंटीकरप्शन ब्युरो करत आहे.
No comments