Header Ads

  • ताजा खबरें

    उज्वला योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ३१ हजार जणांना गॅस जोडणी

    gas-connection-to-about-31-thousand-people-in-the-district-from-ujwala-scheme ठाणे (बदलापूर विकास मिडिया) दि ४:- प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात ३१ हजार १७ लाभार्थींना एलपीजी गॅस जोडणी दिल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे प्रशांत वर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
    ठाणे जिल्ह्यात या योजेनांतर्गत ६०४ जोडण्या इंडियन ऑईल, ११ हजार १५८ भारत पेट्रोलियम, आणि  १९ हजार २५५ जोडण्या हिदुस्थान पेट्रोलियमने दिल्या आहेत. या जोडण्या २०१६ पासून देण्यात येत आहेत. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे
    अंबरनाथ ४११९, भिवंडी ४०२९, कल्याण १०४२, मुरबाड ७०५५, शहापूर ११,७५४, ठाणे १४५३, उल्हासनगर १५६५
    या जोडण्या दिलेल्या लाभार्थीपैकी ७९ टक्के लाभार्थींनी एलपीजी सिलेंडर पुन्हा भरण्यासाठी परत आणले आहे. हे लाभार्थी १४.२ की ग्राम वजनाच्या सिलेंडर ऐवजी त्यांना परवडेल असा ५ किलो वजनाचा लहान सिलेंडर देखील घेऊ शकतात अशी सोय आहे.
    ठाणे जिल्ह्यात एकूण एलपीजी गॅस जोडणी ९६.६ टक्के इतकी आहे.
    या पत्रकार परिषदेस जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी देखील उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad