आंब्रे, जाधव या खेळाडूंना तालुका क्रीडा अधिकारी म्हणून पदस्थापना
ठाणे दि ३ : अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर गट अ आणि गट ब च्या पदांवर नियुक्ती देण्याबाबत निर्णय झालेला आहे. त्याला अनुषंगून भक्ती आंब्रे यांची कल्याण तालुका क्रीडा अधिकारी आणि सायली जाधव यांची अंबरनाथ तालुका क्रीडा अधिकारी म्हणून पदस्थापना करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. लतिका माने यांना वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
भक्ती आंब्रे यांनी वेटलिफ्टर म्हणून कामगिरी केली आहे तर सायली जाधव अंतरराष्ट्रीय कब्बडीपटू आहेत.
No comments