उल्हासनगर भाजपा नेता जमनु पुरस्वानी यांच्या हॉटेल मध्ये बैन प्लास्टिकचा साठा
उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि राज्याच्या विकासासाठी विविध निर्णय घेत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने हानी असलेल्या प्लास्टीक पिशव्यांवर भाजपा सरकार ने काही महिन्यांपुर्वी बैन आणण्याचा निर्णय घेतला व संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्लास्टिकच्या वापरावर बंदी करण्यात आली होती. वापरणार्यांवर तसेच प्लास्टीक पिशवी विकणार्यांवर कडक कारवाई तसेच दंडवसुली केली जात होती. ज्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशवी वापरणे सोडुन भाजपाच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.
परंतु उल्हासनगर शहरात भाजपा सरकारच्या या निर्णयाने स्थानिक भाजपा नेता जमनु पुरस्वानी ला काही घेणे देणे नसल्याचे बोलले जाते. त्याचे कारण असे की आज उल्हासनगर महापालिकेच्या प्लास्टीक पिशवी पकडणार्या स्कॉडने त्यांच्या हॉटेल मधुन प्लास्टीक पिशवीचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
नुकताच 31 डिसेंबरच्या दिवशी उल्हासनगर शहरात एक व्हिडीओ व्हायरल झाले होते ज्यामध्ये शहरात आजही प्लास्टीक पिशवीचा बिंधास्तपणे वापर असल्याचे दिसुन येत होते. तसेच उमपाच्या कर्मचार्यांना गोपनिय सुत्रांकडुन काही उल्हासनगरातील ठराविक हॉटेल मध्ये आजही बैन प्लास्टिकचा सर्रास वापर केला जातो अशी माहिती मिळाली होती, त्याअनुशंगाने उल्हासनगर येथील वैष्णु हॉटेल व कपिलेश्वर हॉटेलवर छापा मारण्यात आला असुन त्याठिकाणी कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा मिळाला आहे. पंचनामा करुन दोन्ही हॉटेल चालकाला 10 हजाराचा प्रत्येकी दंड ठोठावुन अनधिकृत्त प्लास्टिक जप्त करण्यात आले अशी माहिती उमपाचे अधिकार्यांनी बदलापुर विकासच्या प्रतिनिधीला दिली.
उमपाचे आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशावरुन स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. अनधिकृत्त प्लास्टिकचा साठा असलेले हॉटेल हे उल्हासनगर भाजपा नेता जमनु पुरस्वानी यांच्या नातेवाईकाचे असल्याने भाजपा पक्षातीलच जेव्हा भाजपा सरकारचा निर्णय जुमानत नाही तर सामान्य नागरिकांनी तरी भाजपाला गांभिर्याने का घ्यावा असा सवाल उल्हासनगरातील रहिवाश्यांनी केला आहे.

No comments