Header Ads

  • ताजा खबरें

    लाच मागितल्याप्रकरणी कु.ब.न.प. लिपीक विरोधात पोलिसात तक्रार दाखल

    बदलापूर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील पूर्व भागात शिरगाव येथील पाच घरांचा घरपट्टी कर कमी करुन देण्यासाठी एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडे कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता कर विभागात काम करणारे लिपिक कांतिलाल भल्ला यांनीच लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
    सध्या ठाणे अंटीकरप्शन ब्युरो तर्फे विविध ठिकाणी सापळा रचुन भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांना पैसे घेतांना रंगेहाथ पकडण्याचे सत्र सुरु असतांना कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे काही लाचखोर महाभाग कोणतीही भिती न बाळगता पैश्याची मागणी करुन नागरिकांना हैराण करत असल्याने एसीबीच्या सापळ्यात कु.ब.न.प. चा लाचखोर ही सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad