Header Ads

  • ताजा खबरें

    वीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त बदलापुरात अभिवादन

    veer bhai kotwal purnatithi kisan kathore vijaya raut badlapur vikas news media बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे रायगड जिल्ह्यातील वीर भाई कोतवाल यांचा 2 जानेवारी रोजी पुण्यतिथी असल्याने काल रात्री बदलापुर हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक येथे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया मोहन राऊत व इतर राजकिय नेत्यांनी अभिवादत केले.
    त्यावेळी भाजपा गटनेता राजेंद्र घोरपडे, माजी नगरसेवक अविनाश मोरे, नगरसेविका सौ. शितल प्र. राऊत, आगरी संघटनेचे दुर्वास धुळे, आगरी समाज उन्नती मंडळाचे दिपक म्हात्रे व इतर मान्यवरतसेच आगरी समाजातील व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुष्पहार अर्पण करुन तसेच दिपप्रज्वलन करुन अभिवादन कार्यक्रम पार पाडण्यात आला.


    माहित आहे? भाई कोतवाल कोण होते ? हुतात्मा भाई कोतवाल-मॅन ऑफ दी पीपल
        कतृत्व,विद्वत्तता आणि शोर्याचे वरदान रायगडला लाभलेले आहे.गगनाला गवसणी घालणारे अनेक महापुरूष रायगडने देशाला दिले.दुर्दैवानं स्वातंत्र्योत्तर कालखंडात रायगडच्या सर्वच नररत्नांना ङ्ग न्यायङ्घ मिळालाच असं नाही.व़िठ्ठल लक्ष्मण त था भाई कोतवाल असेच उपेक्षित स्वातंत्र्यवीरांपैकी एक.अफाट बुध्दीमत्ता,अचाट कर्तुत्व,पराकोटीचे मातृप्रेम,कमालीचे संघटन कौशल्य लाभलेल्या भाई कोतवालांचा जन्म निसर्गरम्य माथेरानमध्ये 1 डिसेंबर 1912 रोजी एका गरीब कुटुंबात झाला.जेमतेम 31 वर्षांचे आय़ुष्य लाभलेल्या हुतात्मा कोतवाल यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्राला समर्पित केला.पुण्यात शिक्षण घेताना शि.म.परांजपे यांच्या काळमधील लेखांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला.वि.दा.सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर, तसेच जोसेफ मॅझिनी,गॅरी बोल्डी यांच्या पुस्तकांनी त्यांच्या मनातील स्वातंत्र्याच्या उर्मी जागृत केल्या.त्यामुळं शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.1942च्या चळवळीत भाई कोतवाल,हिराजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज सरकारला अक्षऱशः  सळो की पळो करून सोडलं होतें. त्यांचा ङ्गआझाद दस्ताङ्घ रेल्वेचे रूळ उखडून टाक ायचा, विजेच्या तारा तोडायचा अन्य घातपाती कारवाई करून  जंगलात पसार व्हायचा. या गनिमीकाव्यामुळं  सरकार त्रस्त झालं  होतं  मात्र .जंग जंग पछाडल्यानंतरही भाई आणि त्यांच्या साथीदारांना पक़डण्यात  सरकारला यश येत नव्हतं.त्यामुळं भाई कोतवाल आणि गोमाजी रामा पाटील यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास सरकारने पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते.अखेर पैश्याच्या लालसेनं घात केला.एका फितूरानं पोलिसांना भाईंचा जंगलातील ठावठिकाणा तपशीलवार सांगितला. त्यानुसार हॉल नावाचा पोलिस अधिकारी शंभर बंदुकधारी पोलिसांचा ताफा घेऊन भल्या पहाटेच जंगलात घुसला.पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रारंभी हिराजी पाटील हुतात्मा झाले.त्यानंतर भाई कोतवाल यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला गेला.  अ खेर सिध्दगडच्या पावनभूमीत रायगडचा हा सुपूत्र हुतात्मा झाला.तो दिवस होता 2 जानेवारी 1943 चा.
    - मुंबई सरकारच्या गोपनीय अहवालात भाई कोतवालांचा उल्लेख " मॅन ऑफ दी पीपल" असा केला गेला आहे.भाई हुतात्मा कोतवाल रायगडचे सुपूत्र आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. 
    -एस.एम.देशमुख ( पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे संस्थापक)
    हुतात्मा भाई कोतवाल यांचा लेख लिहणारे लेखक हे  

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad