Header Ads

  • ताजा खबरें

    आता रुग्णवाहिकांना मनमानी दर आकारता येणार नाहीत

    आरटीओने जिल्ह्यासाठी निश्चित केले भाडे दर
    now-ambulances-can-not-be-charged-arbitrarily.html ठाणे (बदलापूर विकास मिडिया) दि ४:- आता शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेता येणार नाहीत. प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे यांनी रुग्णवाहिकांचे दर निश्चित करून दिले असून हे भाडेपत्रक रुग्णवाहिकाना आतमध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले.
    ठाणे व नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी :
    -मारुती व्हेन (अवातनुकुलीत) १० किमीसाठी  ५०० रुपये, १० ते २० किमीसाठी १०००, २० ते ३० किमीसाठी १५०० , ३० किमीपेक्षा जास्त २० रुपये प्रति किमी
    -  आयसीयू (वातनुकुलीत) १० किमीसाठी  २००० रुपये, १० ते २० किमीसाठी ३०००, २० ते ३० किमीसाठी ४००० , ३० किमीपेक्षा जास्त ५५ रुपये प्रति किमी
    -  टाटा सुमो व मेटेडोर सारख्या वाहनांना (अवातनुकुलीत) १० किमीसाठी  ६०० रुपये, १० ते २० किमीसाठी १२००, २० ते ३० किमीसाठी १६०० , ३० किमीपेक्षा जास्त २३ रुपये प्रति किमी
    -  टाटा ४०७ स्वराज माझदा आदीच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (वातनुकुलीत) १० किमीसाठी  ७०० रुपये, १० ते २० किमीसाठी १३००, २० ते ३० किमीसाठी १७०० , ३० किमीपेक्षा जास्त २५ रुपये प्रति किमी
    कल्याण उल्हासनगर , भिवंडी, मीरा भाईंदर , वसई व इतर ग्रामीण भाग  
    -  मारुती व्हेन (अवातनुकुलीत) १० किमीसाठी  ४०० रुपये, १० ते २० किमीसाठी १८०० , २० ते ३० किमीसाठी १२०० , ३० किमीपेक्षा जास्त १८ रुपये प्रति किमी
    -  आयसीयू (वातनुकुलीत) १० किमीसाठी  १८०० रुपये, १० ते २० किमीसाठी २६००, २० ते ३० किमीसाठी ३५०० , ३० किमीपेक्षा जास्त ५० रुपये प्रति किमी
    -  टाटा सुमो व मेटेडोर सारख्या वाहनांना (अवातनुकुलीत) १० किमीसाठी  ४५० रुपये, १० ते २० किमीसाठी ९००, २० ते ३० किमीसाठी १३५० , ३० किमीपेक्षा जास्त २० रुपये प्रति किमी
    -  टाटा ४०७ स्वराज माझदा आदीच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (वातनुकुलीत) १० किमीसाठी  ५०० रुपये, १० ते २० किमीसाठी १०००, २० ते ३० किमीसाठी १५०० , ३० किमीपेक्षा जास्त २२ रुपये प्रति किमी
    पहिल्या १ तासाच्या प्रतीक्षा कालावधीसाठी कोणतेही शुल्क लागू होणार नाही. दर आकारताना गंतव्य ठिकाणानुसार आकारले जाणार नाहीत तर ते वाहन कोणत्या कार्यक्षेत्रात कार्यरत असते त्यावर आकाराला जाईल.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad