Header Ads

  • ताजा खबरें

    रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्म करिता सकारात्मक प्रतिसाद ; आमदार आव्हाडांचा पाहणी दौरा

    positive-response-to-the-railway-platforms-home-platform-mla-avhads-inspection-tour ठाणे (बदलापुर विकास मिडिया)- कळवा रेल्वे स्थानक येथे कारशेड मधून निघणाऱ्या लोकल करिता होम प्लॅटफॉर्म करा या संदर्भात सेंट्रल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अमोल कदम यांनी रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पुढाकार घेत गुरुवारी कळवा रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. 
    कळवा रेल्वे स्थानक येथे प्रवाशांना सकाळच्या वेळी गर्दीमुळे चढता येत नसल्याने प्रवासी कारशेड मधून सकाळी निघनारी लोकल रुळावर उभे राहून पकडतात. आता कळवा रेल्वे स्थानकाचा विस्तार होत असून कळवा स्थानक येथून चार लाईन जात आहेत, यामध्ये दोन मार्ग जलद लोकल करीत आणि दोन मार्ग धीम्या लोकल करीत असणार आहे. यामध्ये स्थानकातील दोन नंबर फलाट येथील तिकीट बुकिंग कार्यालय, पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली स्थानकातुन बाहेर येण्याची शेड नवीन मार्ग होण्याकरिता हटविण्यात येणार आहे, यामुळे एक नंबर फलाट येथील पादचारी पुलाचा भाग पश्चिमेला कारशेड च्या जागी उतरविण्यात येणार आहे. यामुळे या पादचारी पुलापासून नागरिकांना ये-जा करण्याकरिता कारशेड गेटच्या बाजूनी ये-जा करावी लागणार आहे. यामुळे कारशेडचे गेट पोल क्रमांक ३७ पासून आत मध्ये घेण्यात येणार आहे. यामुळे कळवा कारशेड मधून निघणारी लोकल करिता प्लॅटफॉर्म बांधता येऊ शकतो. यामुळे या संदर्भात सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती सदस्य अमोल कदम यांनी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव दाखल केल्यामुळे याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून गुरुवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रेल्वे स्थानक येथे पाहणी दौरा करून रेल्वेच्या विकास कामांचा आढावा घेतला आणि होम प्लॅटफॉर्म होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सेंट्रल रेल्वे बोर्ड सल्लागार समितीचे सदस्य अमोल कदम, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे खजिनदार सुरज कदम, कळवा स्टेशन मास्तर के जी विनोद आदी उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad