Header Ads

  • ताजा खबरें

    गंभिर गुन्ह्याबाबत पुरावा असलेल्या बदलापुराील सोसायटीतील सी.सी.टी.व्ही. फुटेज गायब


    -भाजप पदाधिकारी व बांधकाम व्यवसायिक प्रसाद भोपी वादाच्या भोवर्यात

    -गायब सी.सी.टी.व्ही. फुटेज पुन्हा एकदा भाजप लिंक
    बदलापूर - बदलापूर शहरात नुकताच घडलेल्या विविध गंभिर स्वरुपाच्या गुन्ह्यांमुळे सी.सी.टी.व्ही.चा मुद्दा जोर धरत असतांना नागरिकांच्या जनजागृतीसाठी बदलापूर विकास मिडियाने याबाबत लेख प्रकाशित केल्यानंतर आता शहरातील विविध ठिकाणाहुन अनेक पिडीत पुढे येऊन आपली समस्या मांडतांना तसेच न्यायपालिकेकडून मदत मागतांना दिसत आहेत.
    पिडीत सोनावणे हे बदलापूर पश्चिम बेलवली गाव रोड येथील शुभ निर्माण सोसायटीत आपल्या परिवारासह राहतात. ही सोसायटी शुभ ग्रुप बिल्डरद्वारे बांधकाम करण्यात आले असुन भाजपा पदाधिकारी प्रसाद भोपी हे त्या बांधकाम व्यवसायाचे एक पार्टर आहेत तसेच सदर सोसायटीच्या विश्वस्तमंडळात सल्लागार ही आहेत. सोनावणे यांनी वेळोवेळी ज्याप्रकारे सोसायटीत अनेक कार्य़क्रमांच्या नावाखाली देणगी घेण्याचे तसेच देणगी देतांना पावती दिली जात नाही याबाबत विचारला केली. तसेच बांधकाम व्यवसायिकाने अद्याप रेरा प्रमाणे बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिलेला नाही व क्लब हाऊन आणि जिम चे काम अद्याप करण्यात आले नाही तसेच गार्डनही फ्लैट घेतांना ज्या प्लॅनप्रमाणे दाखविण्यात आले त्याप्रमाणे केलेले नाही असा पिडीतेचा आरोप आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करुन देखील बिल्डर भोपी यांनी तक्रारींचे दुर्लक्ष केले.
    याबाबत तक्रारदार पाठपुरावा करत असल्याचे पाहुन दि. 18 जानेवारी रोजी सोसायटीच्या काही सभासदांनी तसेच भोपी यांच्या जवळीक असलेल्यांनी संगनमत करुन फिर्यादीचे वडिल यांना बेदम मारहाण करण्यात आले. ज्याप्रकारे ही घटना घडली एखादी दंगलीचे स्वरुप सोसायटीतील अनेकांना पाहायला मिळाल्याने सोसायटीतील इतर रहिवाश्यांनी भयभित होऊन साक्षी देण्याची इच्छा दाखवली नाही. विशेष म्हणजे पिडीतेने जेव्हा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली असता आरोपी हे भाजपा पदाधिकारी प्रसाद भोपी यांच्या समर्थक असल्याने बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याने राजकिय दबाव लक्षात घेत फक्त एन.सी. नोंदविले. या घटनेमुळे भाजपा पक्ष बदलापूर शहरात गुंडगिरी करतांना कशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला नियंत्रण करुन ठेवते हे दिसुन येते.
    पिडीतेच्या वडिलांना मारहाण करणार्या आरोपींनी मारहाणीची घटना झालीच नाही व उलट क्रॉस कम्प्लेंट करत पिडीतेचे वडिल दारुच्या नशेत होते असे सांगितले. पोलिसांच्या तपास आणि पुराव्यांवरुन पिडीतेचे वडिल हे दारुच्या तशेत होते की नाही याबाबत शंका आहे कारण तसे कोणतेच मेडिकल करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोपींना पोलिस तपासात अडथळा होण्यासाठी आणि फिर्यादीवर उलट कारवाई होण्याच्या हेतुने खोटी तक्रार केली की काय असा संशय या घटनेतुन काढला जात आहे.
    विशेष म्हणजे जेव्हा पोलिसांनी आरोपींचा जबाब नोंदविले असता आरोपींनी आमच्याकडे सी.सी.टी.व्ही. फुटेज आहे त्यावरुन सिद्ध होइल असे सांगितले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सोसायटीकडे सी.सी.टी.व्ही. फुटेज ची मागणी केले असता सोसायटीने थेट सदर इमारतीच्या स्थळी इतर बांधकाम सुरु असल्याने कॅमेरे कार्यरत नाही असे सांगितल्याने ह्या पत्रावर नेमकं कोणी सह्या केल्यात आणि कॅमेरे बंद होती की गुन्ह्यातील पुरावा फुटेज गायब करण्यात आला असा प्रश्न बेलवली परिसरातील नागरिकांना पडला आहे. त्यातच पिडीत सोनावणे यांचा आऱोप ही आहे कि भाजपचे भोपी यांच्या सांगण्यावरुन फुटेज गायब करण्यात आले आहे.
    सदर घटनेमुळे सी.सी.टी.व्ही. कॅमरे सोसायटीतील विश्वस्तमंडळ कशाप्रकारे हाताळते हे दिसुन येते. एखाद्या घटनेत जेथे दंगलीचे स्वरुप होते आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेकांकडून मारहाण होते अश्यात महत्वाचा पुरावा म्हणजे सी.सी.टी.व्ही. फुटेज पोलिस तपासादरम्यान मिळणार नसेल तर त्या कॅमेर्यांचा उपयोग काय? तसेच एखाद्या राजकिय पक्षाचा नेता किंवा कार्य़कर्ताच्या नेतृत्वाखाली जर सोसायटीच्या कॅमेर्याचे फुटेज गायब होत असेल तर हे विषय चिंतेची बाब आहे. याबाबत आता स्थानिक बदलापूर पश्चिम पोलिसांनी विचार करुन शहरातील तमाम सोसायट्यांना कॅमेरे आणि फुटेजच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
    पिडीत सोनावणे यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तसेच मुंबई उच्च न्यायालयात न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केल्याचे समजते. याबाबत भाजप पदाधिकारी व बांधकाम व्यवसायिक प्रसाद भोपी यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
    सी.सी.टी.व्ही.च्या गायब होण्याच्या या घटनेत ही भाजप लिंक लागल्याने भाजप पदाधिकारी आणि बांधकाम व्यवसायिक प्रसाद भोपी वादाच्या भोवर्यात सापडले आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad