रणरागिणी महिला पत्रकार फुटक्या राजकारण्याच्या आमिषाला बळी पडणार नाही - जनतेचा विश्वास
- आरोपीकडून पिडीतेला 5 कोटीची ऑफर मिळाल्याची शहर भरात अफवा
बदलापूर - नुकताच शाब्दीक विनयभंग केल्याप्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेले आरोपी वामन बारकु म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयातुन अटकपुर्व जामिन मंजुर झाल्याने कोर्टाच्या आदेशात ‘फिर्यादी व त्यांच्यातर्फे खाजगी वकिल हे कोर्टात आपले म्हणे माडण्यासाठी हजर नाही’ असे समुद असल्याने बदलापूर शहरात विविध व्हॉ्ट्सअप ग्रुप वर तसेच ठिकठिकाणी एक वेगळी चर्चा ऐकायला मिळत होती. शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे यांनी फिर्यादीने 5 कोटीची ऑफर दिल्याची ही चर्चा होती.
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ह्या एक निर्भिड महिला पत्रकार असुन त्यांनी आजवर बदलापूर शहरातील अनेक महत्वाच्या बातम्या प्रकाशित केल्या आहेत. त्यांनी नुकताच केलेल्या प्रशासकीय इमारतीच्या भुमिपुजन बातमीमुळेच वामन म्हात्रे यांना राग येऊन त्यांनी घटनेच्या दिवशी अपनामास्पद वागणुक केली. याबाबत पिडीत महिला न्याय मिळणेसाठी अनेकदा पोलिस ठाण्यात तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण सत्र न्यायालयात उपस्थित राहुन आपला जबाब नोंदविला. विशेष म्हणजे ज्याने गुन्हा केला तो फरार आणि ती पिडीत आहे तिला मात्र या भ्रष्ट सिस्टमने मानसिक त्रास करुन ठेवले आहे. विशेष म्हणजे नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने लावलेला निकाल ही आश्चर्य चकित करणारे होते कारण 29 ऑगस्ट रोजी आरोपी म्हात्रे तर्फे वकिल पिटीशन दाखल करतात आणि दुसर्याच दिवशी बोर्डावर तारिख येते त्यामुळे पोलिसांनी समज दिले असले तरी फिर्यादी ने बदलापूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास करणे हे किती योग्य आहे. याबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने विचार करणे गरजेचे आहे. जेथे पिडीतेने वारंवार लोअर कोर्टात आणि पोलिसात जबाब नोंदविला आणि त्याअनुषंगाने पुढे आरोपी म्हात्रेंचा अटकपुर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आला अश्या आदेशाला अनुसरुन मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेण्याऐवजी थेट फिर्यादी किंवा फिर्यादीतर्फे खाजगी वकिल न आल्याने ज्याप्रकारे विनयभंगाच्या आरोपीचा अटकपुर्व जामिन मंजुर केला ते हास्यास्पद आणि आश्चर्यचकित करणारे असल्याची शहरात चर्चा आहे.
एका मागास्वर्गीय महिला पत्रकारावर अश्याप्रकारची घटना झाल्यानंतर ही मुंबई उच्च न्यायालय आरोपीचा अटकपुर्व जामिन मंजुर केल्याने बदलापूर शहरात वेगळी चर्चा ऐकायला मिळाली. ती चर्चा म्हणजे आरोपी म्हात्रे यांनी फिर्यादीला मैनेज करण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर दिली म्हणुन. याबाबत अधिक चौकशी केले असता फिर्यादी अश्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही हे दिसुन येते. त्यामुळे 5 कोटीची ऑफर हे फक्त दिशाभुल करण्यासाठी होते की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि, 4 सप्टेंबर रोजी या केसची सुनावणी होणार त्यामुळे फिर्यादी महिला पत्रकार मोहिनी जाधव ह्या आपल्या वकिलांसोबत त्यादिवशी उपस्थित राहणार असल्याचे समजते.
No comments