आगीची झळ बसलेली वरप, मांगरूळची रोपवने वन विभाग कोणत्याही परिस्थितीत वाचवणार
वरप प्रकरणी पाच आरोपींना देखील अटक
ठाणे दि 17: कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली असून वरप प्रकरणी 5 आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळवण्यात आली आहे. मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्तेशात्न येथे गुन्हा दाखल झाला असून हे कृत्य करणार्या समाजकंटकांचा तपास सुरु आहे अशी माहिती उप वनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन्ही घटनांमध्ये आगीची झळ पोहचलेल्या रोपांना जिवंत ठेवण्याचे हरप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत.वरप येथे रोपवनालगत मौजे कांबा येथील तुकाराम आडे, रामू राठोड, अनिल आडे, शुभम आडे, प्रकाश राठोड या व्यक्तींनी शेणाच्या गोवर्या थापण्यासाठी जागा साफ केलेली आढळून आली, तेथूनच आग पसरल्याचे तपास केला असता आढळले. महाराष्ट्र वन नियमावली व वन अधिनियमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रथम वर्ग न्यायालयामार्फत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे. वरप येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 18.7 हेक्टर क्षेत्रावर 9 हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी 3 हेक्टर क्षेत्र जाळले असून 1 हजार रोपांना आगीची झळ पोहचली आहे.
मांगरूळ येथील आगीत 7 हेक्टर क्षेत्रातील 12 हजार 633 रोपांना आगीची झाल बसली आहे. याच ठिकाणी डिसेंबर 2017 मध्ये लागलेल्या आगीत 8 हेक्टर क्षेत्रातील गावात व पालापाचोळा जाळून 20 हजार रोपांना झळ बसली होती. त्यानंतर वन विभागाने याठिकाणच्या रोपांना अति तातडीने पाणी देण्यासाठी बोअरवेल घेणे, मोटार वासाविणे, वीज पुरवठा करणे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 6 लाख 72 हजार 500 रुपये खर्च केला होता. या रोपवनात मे 2018 पर्यंत जिवंत रोपांची टक्केवारी 82 टक्के होती. या रोपवनाच्या रखवालीसाठी 2 रखवालदारही नेमले आहेत. याठिकाणी गावात कापणे, जाळ रेषा घेण्याचे काम बदलापूर वन क्षेत्रपाल यांनी सुरु केले होते. पावसाळ्यानंतर दाट वाढलेले गवत काढण्याचे, निंदनी व बेणणी करण्याचे नियोजनही केल होते. याकामासाठी दिवाळीमुळे स्थानिक मजूर न मिळाल्याने बाहेरून मजूर आणून कामे सुरु केली होती, मात्र या ठिकाणी काही समाजकंटकांनी परत आग लावली. या वनातील मृत होणार्या झाडांना वाचविण्यासाठी पाईपलाईनने पाणी देण्यात येत आहे तसेच दाट वाढलेले गावात काढण्याचे काम परत सुरु केले आहे. ज्या क्षेत्रात आग लागली नाही तिथे 91 टक्के रोपं जिवंत असून हे पालकमंत्री आणि खासदार यांच्या पुढाकाराने व मेहनतीने लावलेले रोपवनदेखील वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे असेही डॉ रामगावकर म्हणतात
No comments