Header Ads

  • ताजा खबरें

    अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे मोफत महाआरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न

    * हजारो गरजू नागरिकांनी घेतला लाभ * शाखाप्रमुख डी. मोहन यांनी दिली माहिती

    अंबरनाथ - शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शिवसेना फुलेनगर शाखेने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत महाआरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते, फुलेनगर व आसपासच्या परिसरातील हजारो गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती फुलेनगर शाखाप्रमुख डी. मोहन यांनी पत्रकारांना दिली.
    सध्या महागाईत माणूस आपल्या दैनंदिनी गरजा भागविण्यासाठी त्रस्त झालेला असतांना स्वतः किंवा परिवारात कोणी आजारी पडल्यास त्याची अधिकच कुचंबना होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शिवसेनेने सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा म्हणून या प्रकारच्या मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिबिराचे उद्घाटक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली. सदर शिबिरात नेत्ररोग, कर्करोग, मूत्ररोग, किडनी विकार, मधुमेह, स्त्री रोग, बाल रोग, अस्थीवंगोपचार, कान-नाक-घसा संबंधित विकार, श्‍वसन रोग, क्षयरोग, मानसिक आजार सारख्या अनेक आजारावर तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले, गरजू लोकांना मोफत औषधे ही देण्यात आली, शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी, ईसीजी, इंजिओग्राफी, जनरल सर्जरी, एक्स-रे आदींचीही व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिराला शिवसेनेचे शहराध्यक्ष अरविंद वाळेकर, आमदार डॉ बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर, सुभाष साळुंखे, उद्योगपती बेचर पटेल, समाजसेवक भरत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad