Header Ads

  • ताजा खबरें

    बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध

    सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नांना यश
      सावंतवाडी :- आद्यवृत्त पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवनासाठी अखेर तीन कोटींचा निधी देण्यात आला आहे. पत्रकार भवनाच्या कामाचा शुभारंभ नववर्षाला करण्यात येईल, पालकमंत्री ना.दिपक केसरकर यांनी सदर निधीच्या हस्तांतराचा शासकीय आदेश जिल्हा पत्रकार संघाकडे पाठवला असल्याची माहिती, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सेके्रटरी गणेश जेठे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
    सिंधुदुर्गनगरीत बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवनाची मागणी जिल्हा पत्रकार संघाने केली होती.. मराठी पत्रकार परिषदेने त्याचा पाठपुरावा केला होता.. त्यामुळे 18 मार्च 2016 रोजी अर्थसंकल्प अधिवेशनात तरतुदीची घोषणा अर्थमंत्री मुनगंटीवार आणि अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी केली होती. दरम्यान, पत्रकार संघाने पत्रकार संघाचा भुखंड शासनाला देवून प्लॅन इस्टिमेंट प्रस्ताव पूर्ण केला होता. शासनाने 5 कोटींचा निधी मंजूर केला. परंतु निधी हस्तांतरीत न झाल्याने गेली अडीच वर्षे पत्रकार भवनाचे काम थांबले होते. पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यानंतर पालकमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देवून निधी तात्काळ न मिळाल्यास घेराव आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. 
    दरम्यान, पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सदर निधी तात्काळ वर्ग करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करून शासकीय आदेश निर्गमित केला आहे. सदरचा आदेश प्राप्त झाला असून मुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री यांच्या सोयीनूसार भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

    वाचा - जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी अर्चना देशपांडे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
            - परिचय केंद्राद्वारे राजधानीत महाराष्ट्राची प्रतिमा उंचविण्याचे उत्तम कार्य -खासदार राजू शेट्टी
            - महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकास कामांविषयी महत्वपूर्ण बैठक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री मुनगंटीवार, पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, खासदार नारायण राणे, परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, माजी जिल्हाधिकारी उदय चौधरी, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, सां.बां.चे कार्य अभियंता व्हटकर, विनायक जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, आर्किटेक्ट श्री.नष्टे, माजी आमदार प्रवीण भोसले, बबन गवस आदींचे पत्रकार संघातर्फे गजानन नाईक आणि गणेश जेठे यांनी आभार मानले.
    बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अथॅमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad