Header Ads

  • ताजा खबरें

    देशपांडे फाऊंडेशन तर्फे सत्कर्म आश्रमातील मुलांना साहित्य व अन्नधान्य वाटप

       बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- नववर्ष 2019 च्या स्वागतार्थ देशपांडे फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने काल 30 डिसेंबर रोजी बदलापूर पश्चिम सोनिवली येथील सत्कर्म बालकाश्रमात भेट दिली. 
    देशपांडे फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असुन एक रुपयाही न घेता अनाथ व निराधार व्यक्तींचे कायमस्वरुपी संगोपन करणारे संस्था म्हणुन प्रसिध्द आहे. या संस्थेमार्फत आनंद वृध्दाश्रम व अनाथाश्रम चालविले जाते. संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य तसेच नववर्षाचे स्वागत सत्कर्माने व्हावे या हेतुने सत्कर्म बालकाश्रमात भेट देऊन तेथील मुलांना शालोपयोगी साहित्य, अन्नधान्य, फळे, देणगी देऊन सर्व मुलांना व आश्रमातील कर्मचार्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले अशी माहिती सत्कर्म बालकाश्रम या संस्थेचे अध्यक्ष मकरंद वढवेकर यांनी बदलापूर विकासला दिली.

    वाचा - बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध
           - आपणही जर सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करत असाल तर खबरदार...

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad