Header Ads

  • ताजा खबरें

    आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लुनार फाऊंडेशन सामाजिक संस्था कार्यरत

       बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- समाजात अशी अनेक मुलं आहेत जी आपल्या गरीब परिस्थिती किंवा अचानक आलेल्या आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण अपूर्ण सोडतात . 
    अशी परिस्थिती इंग्रजी माध्यम आणि खाजगी शाळेच्या मुलांवर जास्त येते . तरी अशा मुलांना एक आशेचा किरण आणि आधार म्हणून लूनार फाऊंडेशन ह्या संस्थेची स्थापना २०१५ साली करण्यात आली. 
    संस्थेचे संस्थापक जेम्स सेराव हे बदलापूर मधील फातिमा शाळेत शिक्षक असून बहुतेक स्वयंसेवक हे युवक आहेत. आपले शिक्षण किंवा नोकरी सांभाळून लूनार फाऊंडेशन ची टीम अथक परिश्रम करून प्रत्येक वर्षी किमान २० विद्यार्थ्यांच्या शाळेचा खर्च उचलते. हा खर्च अंदाजे १.५ ते २ लाखा पर्यंत जातो. ह्या व्यतिरिक्त अनेक अनाथ आश्रम किंवा झोपड्पट्टीतील मुलांना वह्या पुस्तक आणि शैक्षिणक साहित्याचे वाटप केले जाते. 
    पैसे जमा करण्यासाठी लूनार फाऊंडेशन ची टीम आपल्या मित्र नातेवाईक, यांच्या घरोघरी जाऊनत्यांना संस्थेची संकल्पना सांगुन देणगी घेतात.  समाजातील गरिबीचे चक्र बंद करण्यासाठी शिक्षण हेच एकमेव उपाय आहे असे या संस्थेची मान्यता आहे . 
    समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदत केली तर लुनार फाऊंडेशनला अजुन जास्त मुलांना शैक्षिणक सहायता करता येईल. महिन्याला किमान १०० रुपयाची देणगी सुध्दा जर प्रत्येक विचारवंत माणसाने संस्थेला दिली  तरी हि संस्था शेकडो मुलांना मदत करु शकेन असे  असे संस्थापक जेम्स सेराव यांनी सांगितले. 
    गरजवंतांना मदतीचा हात देणार्या लुनार फाऊंडेशन बाबत अधिक माहितीसाठई लूनार फाऊंडेशन , परमानंद चाळ , न्यू सारंगा हौसिंग सोसायटी च्या मागे, सुभाषवाडी , अंबरनाथ (पश्चिम) या पत्त्यावर किंवा व्हाट्सअप : ९८९०७३४९२२ वर संपर्क करु शकता. तसेच www.lunarfoundation.in वेबसाईटला भेट देऊन संस्थेच्या कार्याची माहिती घेऊ शकता असेही शेवटी जेम्स सराव यांनी सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad