Header Ads

  • ताजा खबरें

    गेल्या वर्षी 492 शेतक-यांना लाभ ; आंब्यासाठी पिक विमा योजना ३१ डिसेंबरपर्यंत विमा हप्ता भरा

    ठाणे दि २६: प्रधानमंत्री फसल वीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत पिक विमा योजना सन 2018-19 मध्ये आंबिया बहारकरीता आंबा पिकाकरिता ठाणे जिल्ह्यात लागू झाली आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 डिसें अशी आहे. या योजनेत ठाणे जिल्ह्यात 2017-18 मध्ये एकूण 492 शेतक-यांना रुपये दोन कोटी तेवीस लाख चौवेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट इतका  लाभ मिळाला आहे.
    योजनेची उद्दिष्टये-
    अवेळी पाऊस, कमी - जास्त तापमान, गारपीट  या हवामान धोक्यापासून आंबा उत्पादकांना  संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे.
    फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक धैर्य  राखणे
    ठाणे जिल्ह्यासाठी योजना कार्यान्वत करणारी विमा कंपनी-
     एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्चेंज 
     टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्री,  फोर्ट, मुंबई- 400 023,
      फोन नं. 022 61710912, टोल फ्रि नंबर 18001030061,
      ई मेल - mhwbcis@aicofindia.com
    फळपिक विमा योजनेस पात्र शेतक-यांचे निकष :-
    अधिसूचित महसूल मंडळातील  फळपिके आंबा, घेणारे सर्व शेतकरी
    आंबा फळपिक कर्जदार शेतक-यांना ही योजना सक्तीची राहील
    बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजना ऐच्छिक राहील
    अधिसूचित तालुका निहाय महसूल मंडळ
    विमाधारक शेतक-यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकांची माहिती विमा कंपनीस/संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.

    सफळपिक निहाय विमा संरक्षित रक्कम  शेतकरी हिस्सा इत्यादी (नियमित-गारपीट वगळून)

    अ. क्र.
    फळपिक
    विमा संरक्षित रक्कम
    शेतकरी हिस्सा
    1
    आंबा
    1,21,000
    6050
               
    ·         वाढीव विमा संरक्षित रक्कम, गारपीट विमा दर  शेतकरी हिस्सा इत्यादी (गारपीट करिता)
    अ. क्र.
    फळपिक
    विमा संरक्षित रक्कम
    शेतकरी हिस्सा
    1
    आंबा
    40333
    2017

    तरी पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजने मध्ये कर्जदार शेतक-यांसाठी अनिवार्य आहे. तर बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची आहे.  बिगरकर्जदार शेतक-यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभाग घेवून हवामानाच्या धोक्यापासून पिक संरक्षण करावे. तरी सदर योजनेचा  शेतक-यांनी लाभ घ्यावाअशी विनंती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केली आहे.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad