Header Ads

  • ताजा खबरें

    टाटा कॅपिटल व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट सुविद्या अंतर्गत तालुकास्तरीय विविध शालेय स्पर्धांचे आयोजन

    पाली : सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे आणि टाटा कॅपिटल यांच्या `प्रोजेक्ट सुविद्या' अंतर्गत सुधागड तालुक्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकतृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला या विषयांवरील स्पर्धांचे आयोजन  दि. 1 जानेवारी 2019 ते 4 जानेवारी 2019 या कालावधीत करण्यात आल्याची माहिती सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी दिली. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये या स्पर्धा घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये सहभागी होवून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षक तथा पालकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन घाडगे यांनी केले आहे.  
    निबंध स्पर्धा 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता स्वामी विवेकानंद विद्यालय, मजरे जांभुळपाडा येथे घेण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी गट इ 5 वी ते 7 वी , शब्दमर्यादा 400 इतकी असावी विषय:  1)भारतीय सण व विज्ञान 2) वाचाल तरचं वाचाल. पैकी एक 2) गट इ 8 वी ते 10 वी साठी शब्दमर्यादा 500 इतकी असावी. 
    वक्तृत्व स्पर्धा 2 जानेवारी 2019 सकाळी 10.30 वाजता डॉ. पी. आर. गावंड विद्यालय, परळी येथे घेण्यात येणार आहेत. वत्तृत्व स्पर्धेसाठी गट इ 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा असतील. 
    प्रश्न मंजुषा स्पर्धा 3 जानेवारी 2019 प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी गट इ 5 वी ते 7 वी  2) गट इ 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आहेत. 
    प्रश्नमंजुषा स्पर्धा 3 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता आत्मोन्नती विद्यालय, जांभुळपाडा येथे घेण्यात येणार आहेत.  प्रश्नमंजुषा स्पर्धेचे तीन तज्ञ परिक्षकांकडून परीक्षण केले जाईल,व त्यांचा निर्णय अंतिम राहील. 
    तसेच चित्रकला स्पर्धा 4 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव येथे घेण्यात येणार आहेत. यामध्ये गट इयत्ता 5वी ते 7वी  विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. अधिक माहितीसाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे (9820775080) व शिक्षण समितीप्रमुख वसंत लहाने (9869467809) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन टाटा कॅपिटल व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने करण्यात येत आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad