ताईज् किचनच्या पौष्टीक जेवणानंतर आता 3 रुपयात चहा - नाष्टा
राष्ट्रवादी गटनेता व नगरसेवक कॅ. आशिष आनंद दामले यांचा स्तुत्य उपक्रम
बदलापूरः- गोर गरिबांपासुन ते सामान्य नागरि प्रत्याकाचा विचार करणारा सामान्यातला असामान्य व्यक्तिमत्व असलेले तरुण तडफदार कॅ. आशिष दामले यांनी त्यांच्या ताईज किचन मध्ये स्वस्तदरात जेवण या उपक्रमाला मिळणार्या उत्तम प्रतिसादाला पाहुन नागरिकांसाठी 3 रुपयांपासुन चहा व 4 रुपयात नाष्टा हे उपक्रम सुरु केले आहे.
आजच्या वाढत्या महागाईच्या काळात बदलापुर शहरातील तसेच जवळील ग्रामिण भागातील नागरिकाने पैश्यामुळे पौष्टीक जेवणापासुन वंचित राहु नये या उद्देशाने कॅ. आशिष दामले यांनी त्यांच्या युवाराज प्रतिष्ठान सामाजिक संस्थेमार्फमार्फत 5 रुपयात पौष्टीक जेवण "ताईज किचन" नावाने सुरु केले होते. पौष्टीक जेवण अल्पदरात उपलब्ध करुन दिल्याने परिसरातील नागरिकांना, महिलांना व विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांना अल्पदरात रोज गरमा गरम जेवण भेटत असल्याने ताईज् किचन मध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढु लागली. विशेष म्हणजे पौष्टीक जेवण बनविण्याचे काम सुद्धा परिसरातील महिला बचत गटांना देऊन त्या महिलांना देखील "सक्षमीकरण" करण्याचे काम कॅ. दामले यांच्या नेतृत्वाखाली करुन त्यांना सुद्धा रोजगार मिळाला. अशाप्रकारे "विन-विन" उपक्रम राबविल्याने अल्पावधीतच ताईज् किचन प्रसिध्द झाले.
केरळ, तेलंगाना व तामिळनाडु नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणीतरी नागरिकांचा पोटा पाण्याचा विचार करुन स्वस्त दरात पौष्टीक जेवण उपक्रम राबविल्याने कॅ. आशिष दामले यांचे राज्यभर कौतुक झाले. राष्ट्रवादीच्या प्रमुख सौ. सुप्रियाताई सुळे स्वतः ताईज् किचन ला भेट देऊन पौष्टीक जेवणाचा आस्वाद घेऊन अश्या प्रकारच्या समाज हिताच्या उपक्रम राबविल्याबद्दल कॅ. दामले यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. कॅ. आशिष दामले यांच्या संकल्पनेने साकारण्यात आलेले ताईज् किचन संपुर्ण महाराष्ट्रभर उपक्रम राबविण्याची इच्छा देखील खा. सुप्रियाताई सुळे यांनी दर्शवली होती.
आता पौष्टीक जेवणाच्या यशानंतर नागरिकांच्या सकाळच्या नाष्ट्याची देखील सोय करण्यात आली असुन कॅ. आशिष दामले यांची सामान्य नागरिकांमध्ये लोकप्रियता शिगेला पोहचली आहे. फक्त 3 रुपयात चहा आणि 4 रुपयात नाष्टा नागरिकांसाठी उपलब्ध असल्याने बदलापुरातील नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांनी कॅ. आशिष दामले यांचे आभार मानत त्यांना अश्या समाजकार्य करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो असे आशिवार्द ही दिले.


No comments