Header Ads

  • ताजा खबरें

    ठाण्यात ‘’महापौर चषक जिल्हास्तरीय जलतरण’’ स्पर्धेचे आयोजन

    ठाणे : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा जलतरण संघटना यांचे संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तरीय ठाणे महापौर चषक जलतरण  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 29 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  ठाण्यातील तीन हात नाका येथील ठाणे क्लब,तरण तलाव, रहेजा कॉम्प्लेक्स समोर येथे या स्पर्धा होणार असून हे सामने पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे  यांनी केले आहे.
          यावेळी खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश मस्के,विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती दिपक वेतकर, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे,नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा शर्मिला पिंपळोलकर आदी उपस्थित राहणार आहेत.
          या स्पर्धा ६ वर्षाखालील , ८ वर्षाखालील,  १० वर्षाखालील,  १२ वर्षाखालील,  १४ वर्षाखालील, व १७ वर्षाखालील अशा एकूण ६ गटात होणार असून स्पर्धेसाठी एकूण आठ लाखाची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी हे सामने पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad