Header Ads

  • ताजा खबरें

    27 डिसेंबर - तब्बल 3 तास संपुर्ण देशात केबल सेवा होती बंद ; जाणुन घ्या त्याचे कारण

    ट्रायचा नवा निर्णय ग्राहकांच्या नव्हे तर उपग्र वाहिन्यांच्या फायद्याचे - केबल चालकांचा आरोप
    काल सायंकाळी 7 वाजता अचानक संपुर्ण देशात एकाच वेळी केबल सविर्स बंद करण्यात आली होती. हे पाहुन अनेक ग्राहकांना समजले नाही की आपल्या केबल चालकाने का म्हणुन केबल सेवा बंद केली आहे. तब्बल 3 तास केबल सेवा बंद करत ट्रायच्या नविन नियमाच्या विरोधात सर्व केबल चालकांनी एकजुट होऊन कडकडीत बंद ठेवले. 
    सध्या ट्राय ने जारी केलेल्या नव्या नियमाबाबत अजुनही ग्राहक संभ्रमात असुन बदलापूर विकासचा हा स्पेशल रिपोर्ट.
    29 डिसेंबर 18 रोजी लागु होणार्या ट्रायच्या नियमानुसार केबल टीव्ही चे मासिक शुल्क भरमसाट वाढणार आहे. गेल्या काही दिवसापासुन सर्व पे चॅनल्वर ज्या जाहीराती दाखविल्या जात आहेत त्या पुर्णपणे ग्राहकांची व प्रेक्षकांची दिशाभुल करणारे आहे व एकतर्फी आहे. आजपर्यंत केबल चालक ग्राहकांना 300 रुपयात 300 ते 350 चॅनल्सचा एक बुके देत होते. मात्र नविन सरकारी नियमानुसार ग्राहकास प्रत्येक चॅनल्सचा वेगवेगळा बुके खरेदी करावा लागणार आहे व पसंतीचा सर्वाधिक पाहिल्या जाणार्या पे चॅनल्सचे दर जास्तीत जास्त रुपये 10 ते 19 रुपये करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पहिल्या 100 सक्तीच्या वाहिन्यांकरिता ग्राहकास 130 रुपये सक्तीने द्यावेच लागतील. अधिक या सर्वांवर सरकारी जीएसटी कर 18टक्के लावण्यात येईलच तो वेगळाच.
    या सर्वांचा विचार करत केबल चालकांनी आज जे 300रुपयात ग्राहकास 300 ते 350 चॅनल्स देत होते त्या ऐवजी आता ग्राहकांना आपल्या आवडीचे फक्त 25 मनोरंजन, खेळ, लहान मुलांचे पे चॅनल्स हवे असतील तर त्याकरिता मोठ्या प्रमाणावर अधिकचे शुल्क आकारण्यात येईल. हा घाट फक्त उपग्र वाहिन्यांच्या फायद्यासाठीच घातला जात आहे असे आरोपही केबल चालक करत आहेत. ह्यात नुकसान मात्र ग्राहकांचे व केबल चालकांचे आहे. सरकारी यंत्रनांनी बुके नको म्हणुन जर नविन नियमावली बनविली असेल तर आता वेगवेगळ्या पे चॅनल्सचे वेगवेगळे बुके तेही वाढीव दरात ग्राहकांच्या माथी मारले जातील. नविन सरकारी नियमानुसार ग्राहकांनी भरणार्या मासिक शु्ल्कातील 80 टक्के वाटा हा थेट पे चॅनल्सला मिळणार असुन केबल ऑपरेटरला फक्त 10टक्केच मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना तसेच केबल चालक दोघांनाही याचा खुप मोठा फटका लागणार आहे.
    ट्रायने सदर नियम हे ग्राहकांच्या हिताकडे पाहुन बनविले होते परंतु ट्रायच्या विशिष्ट एका नियमाला ठराविक उपग्र चॅलल्सच्या संचालकांनी मद्रास कोर्टात त्या नियमाविरुद्ध याचिका दाखल केले असुन तुर्तास मद्रास कोर्टाने त्या नियमावर स्टे दिला आहे.
    काय होता तो ग्राहक हिताय नियम?
    ट्रायने ग्राहकाच्या हितासा विचार करुन एक नियम अमलात आणले होते कि, पे चॅनल्स कंपनी बुके चॅनल्सचा दर प्रत्येक वेगवेगळ्या चॅनेल्सच्या दराला अनुसरुन फक्त 10 टक्के कमी करु शकतात. त्यामुळे कंपन्यांची बुके मध्ये स्वस्त आणि वेगवेगळ्या चॅनल्स महागात देण्याची मोनोपोली बंद झाली असती परंतु उपग्र वाहिन्यांच्या संचालकांनी त्याविरोधात हाईकोर्टात धाव घेतल्याने त्या नियमावर स्टे लावण्यात आले आहे.
    ट्रायच्या नविन नियमानुसार ग्राहकाच्या निवडीचे कमीत कमी चॅनल्स पहावयाचे म्हटले तरी मासिक शुल्क 423 रु. होत आहे. तपशील खालीलप्रमाणेः-
    बेसिक पॅकेज 100 फ्रि चॅनल्स 130 रु + निवडीचे महत्वाचे 14 चॅनल्स
    झी मराठी 19 रु, झी टीव्ही 19 रु, झी टॉकीज 17 रु, स्टार प्लस 19 रु, स्टार भारत 15 रु, स्टार गोल्ड 08 रु, कलर मराठी 19 रु, सोनी टिव्ही 19 रु, सब टिव्ही 19 रु, सेट मॅक्स 19 रु, टेन स्पोर्ट 17 रु, डिजनी 08रु, डिस्कवरी 10 रु, आजतक 01 रु व सर्व्हीस चार्ज 20 रु.
    एकूण - 359 रु + जीएसटी 18% = 64 रुपये असे एकुण मिळुन 423 रु
    अशाप्रकारे फक्त महत्वाचे 14 चॅनल्स निवडले तरी केबल टिव्हीचे मासिक शुल्क 423 रु होत आहे. ते ग्राहकावर अन्यायकारक आहे. त्यामुळे सर्व केबल ऑपरेटर्स ग्राहकाच्या हितासाठी हा नियम लागु करण्यास विरोध करीत आहेत. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad