लाचखोर पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक ला 10 हजार लाच स्विकारताना अटक
एसीबी रायगड ची कारवाई
महाडः- एका गुन्ह्यात न्यायालयीत कोठडीत असलेल्या आरोपीच्या वडिलांकडुन गुन्ह्यात आरोपीची मदत करणो असे सांगुन 10 हजार रुपयांची मागणी महाड तालुका पोलिस स्टेशनचा लाचखोर पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक याने मागणी केली होती. आदीच आपल्या मुलाना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असुन आता पोलिस देखील मदत करण्यासाठी पैश्याची मागणी करत असल्यामुळे तक्रारदार यांनी रायगड एंटीकरप्शन ब्युरो कडे फिर्याद दिले. एसीबीने शिताफीने सापळा रचला. दि. 27 डिसेंबर रोजी 11.40 वा. तक्रारदारकडून 10 हजार रुपये लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक याला रंगेहाथ पडकण्यात आले. शंकर जासक याने यापु्र्वी अश्याप्रकारे किती लोकांकडुन लाच घेतले तसेच लाचेची किती रक्कम मालमत्ता जमा केली याची चौकशी आता एसीबी रायगड करत आहे.

No comments