आकर्षक जाहिराती पाहुन आर्यन वन प्रोजेक्ट मध्ये फ्लैट घेणार्यांनो सावधान
बदलापुरः- रिअल इस्टेट मार्केट पुन्हा एकदा जोर पकडत असुन बदलापूर शहरात पुन्हा एखदा फ्लैट खरेदी करणार्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होतांसा दिसुन येत आहे. निसर्गरम्य म्हणजेच बदलापुर शहरात फ्लैट खरेदी करण्याची इच्छा जास्तीत जास्त इन्वेस्टर्स दाखवत असल्याने जास्त नफा मिळवुन ग्राहकांना फसवुन फ्लैट विकणार्या बिल्डरांचेही व्यवसाय सध्या फोफावत आहे. बदलापुरात स्वस्तात घरे, स्वस्तात फ्लैट, विविध एमेनीटिसनी नटलेले प्रोजेक्ट असे विविध जाहिराती दाखवुन ग्राहकांना आकर्षण केले जाते. एकदा ग्राहकाने त्या गृहनिर्माण प्रोजेक्ट मध्ये आपले पैसे गुंतवले की त्यानंतर बिल्डरचा खरा रुप तसेच प्रोजेक्ट मधील विविध तृटी ग्राहकाच्या लक्षात येते परंतु वेळ निघुन गेल्याने पश्चाताप करण्यापलीकडे ग्राहकाला दुसरे काही करता येत नाही. आज जग हे टेक्नीकली खुप प्रगती करत असले तसेच स्मार्ट गॅजेट्सचा काळ आला असला तरी आजही जर एखाद्या ग्राहकाला बिल्डरने फसवणुक केली तर त्याविरोधात पोलिसांत किंवा कोर्टात तक्रार किंवा याचिका दाखल करण्यास ग्राहक धजावत नाही. त्याचा पुरेपुर फायदा बिल्डर मंडळी घेत असल्याने फ्लैट खरेदी करण्यापुर्वीच ग्राहकांना शहाणे झालेले बरे असे तज्ञांचे म्हणणे आहे.
बदलापूर पूर्व शिरगांव याठिकाणी सर्वे नं. 75, 78, 79 येथे एका खाजगी बिल्डरने आर्यन वन नावाने टाऊनशीप उभारले आहे. या टाऊनशिप मधील एकुण ईमारतींपैकी काही ईमारती पुर्ण झाले असुन त्यात लोक राहायला देखील आले आहेत. बिल्डरने फ्लैट विकतांना ग्राहकांना अनेक आश्वासने दिली होती परंतु फ्लैटचे पजेशन घेतल्यानंतर मात्र अनेक सुविधांपासुन ग्राहकांना वंचित रहावे लागल्याचे एका ग्राहकाने बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले. त्याचसोबत बिल्डरने पिण्याचे पाणी 24 तास येणार असे जाहिरातीत म्हटले होते तसेच फ्लैट बुक करत्यावेळी आश्वासन दिले होते परंतु पाण्याची मोठी टंचाई येथे पहायला मिळत असुन 40-50 लाखाचा लक्झीरीयस (नावाला) फ्लैट घेऊन सुद्धा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे आर्यन वन मध्ये राहणार्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एका ग्राहकाने सांगितले कि, आर्यन वन मध्ये फ्लैट बुकिंग करतेवेळी जी रक्कम नक्की झाली होती त्यापेक्षा जास्त रक्कम बिल्डने रजिस्ट्रीशन नंतर घेतले आहे तसेच अद्याप सोसायटीचे पुर्ण काम न होतांना सुद्धा वार्षिक मेंटेनन्सची मागणी केली आज असल्याचेही ते म्हणाले.
आर्यन वन प्रोजेक्टच्या ग्राहकांच्या फीडबैक जाणुन घेण्यासाठी जेव्हा बदलापुर विकासच्या प्रतिनिधीने प्रयत्न केले असला असे कळले कि, अनेक ग्राहकांना आर्यन वन बिल्डरने सांगितलेल्या सर्व एमेनिटीस अजुनही उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. तसेच वारंवार तक्रार करुन सुद्धा आर्यन वन मैनेजमेंट टिम पुर्णपणे ग्राहकाच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे.
काही त्रस्त ग्राहकांनी तर बिल्डर विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार देखील करणार असल्याचे म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बदलापुर विकासने आर्यन वन बिल्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केले असता संपर्क होऊ शकले नाही.
आर्यन वन सारखे अनेक बिल्डर आज बदलापुर शहरात मोठमोठ्या व आकर्षक जाहिराती लाऊन फ्लैट खरेदी करणार्यांना आपल्या प्रोजेक्टचे फ्लैट विकत आहेत. बुकिंग व रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मात्र बिल्डरचा तसेच प्रोजेक्टचा खरा रुप दिसल्यानंतर ग्राहकांना धक्का लागतो.
आपल्याला ही जर एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या विविध स्किमचा झासा देऊन बिल्डरने फसविल्यास किंवा फ्लैट विकतांना मान्य केलेल्या एमेनिटीस सुखसोयी पुरविले नसल्यास दै. बदलापूर विकास ला badlapurvikas@gmail.com या ईमेल वर किंवा 7219218882 या व्हॉट्सअप नंबरवर पुर्ण माहिती पाठवा. आम्ही अश्या बिल्डरचा खरा चेहरा लोकांसमोर आणु तसेच पाठपुरावा करुन ग्राहकाला न्याय मिळवुन देण्याचे प्रयत्न करु.

No comments