बाल्मिकी विकास संघाचे राष्ट्रीय अधिवेशन ठाण्यात संपन्न
ठाणे, दि. 27 - बाल्मिकी विकास संघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच ठाण्यात संपन्न झाले.
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन एनकेटी ट्रस्टचे अध्यक्ष, समाजरत्न नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये बाल्मिकी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने बाल्मिकी मेहतर समाजातील महाराष्ट्रात राहत असलेल्या लोकांना जातीचा दाखला मिळण्यासाठी 1950 ची जाचक अट रद्द करावी तसेच महाराष्ट्रात जन्म झालेल्या मुला-मुलींना जातीचा दाखला देण्यात यावा. मंत्रालयासमोरील मेट्रो 3 च्या स्थानकाला महर्षी बाल्मिकींचे नांव देण्यात यावे. बाल्मिकी मेहतर समाजाच्या वस्त्यांमध्ये महर्षि बाल्मिकी भवन बांधण्यात यावे. म्हाडा व सिडकोच्या इमारतींमध्ये बाल्मिकी मेहतर समाजाच्या लोकांना 2 टक्के आरक्षण देण्यात यावे. मेहतर समाजातील सुशिक्षित, बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावेत तसेच बेरोजगार तरुणांना स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत. महर्षि बाल्मिकी जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशा विविध मागण्यांबाबत अधिवेशनात चर्चा करुन ते ठराव मंजूर करण्यात आले. या सर्व ठरावांवर केंद्र व राज्य सरकारने बाल्मिकी विकास संघाच्या पदाधिकाऱयांबरोबर चर्चा करून या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन बाल्मिकी विकास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामवीर पारचा यांनी केले आहे.
दुसऱया दिवशीच्या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक, कामगार नेते रवि राव, कामगार नेते मोहन तिवारी, वाल्मिकी विकास संघाचे उत्तरप्रदेश महासचिव विजय कुमार मेहरोलीया, राष्ट्रीय अध्यक्ष रामवीर पारचा यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. या सत्रात बाल्मिकी समाजाच्या रुढीवादी परंपरांबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. त्यात राष्ट्रीय अध्यक्ष - रामवीर पारचा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष - बिरपाल भाल, राष्ट्रीय संरक्षक - किरणपाल भारती, राष्ट्रीय कोषाध्यक्ष - विरसेन मंगवाना, राष्ट्रीय महासचिव - नरेश भगवाने, राष्ट्रीय महासचिव - विजयकुमार मेहरोलिया, राष्ट्रीय महासचिव - ओमप्रकाश मरोठीया, राष्ट्रीय महासचिव - संजय खैर, राष्ट्रीय उपाध्यक्ष - राजपाल मरोठीया, राजपाल बेहनवाल, महेश चौहान, ओमकार बर्नवाल, विजयपाल करौतिया, ओमवीर ढोकालिया; संघटन मंत्री - नानकचंद धिंगान, कार्यालय मंत्री - धर्मपाल राजौरिया, कार्यकारिणी सदस्य - सोमवीर पारचा, राष्ट्रीय सदस्य - हरकिशन टाक, लिगल ऍडव्हायझर - ऍड. वंदना मंगवाना, ऍड. प्रिया चंदेलिया, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष - नरेश बोहीत, ठाणे जिल्हा अध्यक्ष - बाबुलाल करौतिया आणि उपाध्यक्ष - सतपाल भगवाने यांचा समावेश आहे. तसेच नशामुक्ती अभियानाचे अध्यक्ष - ललित मरोठीया आणि बालसंस्कारचे अध्यक्ष म्हणून विनोद भाल यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
समारोप समारंभाला डॉ. संजय मं. गो., आम आदमी पक्षाचे उन्मेष बागवे, ठाणे मनपा सभागृह नेते नरेश म्हस्के, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, माजी नगरसेवक मुन्ना बिस्ट, माजी नगरसेवक पवन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जगदीश गढीवाल, शाम पारचा, अनिल गढीवाल, विजय कुडीया, अजय राठोड, सुजित भाल, प्रविण खैरालिया, हरबंस चौहान, यशपाल मेवाती, अशोक परमार, सोनू वाल्मिकी, विक्की वाल्मिकी, सागर जिनवाल, दिनेश चौहान आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
No comments