वार्ड क्र. 26 आयोजित भव्य किल्ले व रांगोळी बक्षीस वितरण समारंभ सम्पन्न
बदलापूरः- कुळगांव बदलापरू नगरपरिषदेचे नगरसेवक सुरज मुठे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वार्डात भव्य किल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. उत्कृष्ट किल्ले बनविणार्या स्पर्धकांना तसेच आकर्षक रांगोळी काढणार्या स्पर्धकांतील विजेत्यांना आज बक्षिस वितरण करुन गौरविण्यात आले.
त्यावेळी बक्षीस वितरण समारंभात माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, भाजपा माजी शहराध्यक्ष जयवंत मुठे व माजी नगरसेविका सौ. मिनल मुठे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. आलेल्या मान्यवरांना नगरसेवक सुरज मुठे व युवा मोर्चा शहर अध्यक्ष नयन मुठे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस व सहभाग प्रमाणपत्र वितरण करत भाजपा आयोजित बक्षिस वितरण समारंभ यशस्वीरित्या पार पाडला.


No comments