रमेशवाडी येथील मेट्रो रेसिडेंसीच्या इमारतीवरुन पडुन कामगाराचा मृत्यु
मेट्रो रेसिडेंसी बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे कामगाराला गमवावा लागला जीव
बिल्डर विरोधात सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची बदलापूर विकासची मागणी
बदलापुरः- आज दुपारी 2.30 च्या सुमारास बदलापुर पश्चिम रमेशवाडी मानव पार्क समोरील मेट्रो रेसिडेंसी या इमारतीवरुन खाली पडुन एका कामगाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे घटना घटल्याच्या तब्बल तीन तासांनंतर पोलिस तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
रमेशवाडी येथील मेट्रो रेसिडेंसी या कॉम्पलेक्स मधील नविन टॉवरचे काम मागील अनेक वर्षांपासुन होत असल्याने अनेक कारणांमुळे सदर काम थांबले होते. काही महिन्यांपुर्वी पुन्हा काम सुरु करण्यात आले असुन कामगारांच्या सुरक्षेबाबत बिल्डरने काही एक उपाययोजना केले नव्हते. शेवटी काळाने काल एका मराठी कामगारावर घात केला व 7व्या मजल्यावर काम करतांना तोल सरकुन खाली पडुन त्याचा मृत्यु झाला. संबंधीत बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचे जीव गेल्याने मेट्रो रेसिडेंसीच्या "त्या" बिल्डर विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी दै. बदलापूर विकासने केली आहे. तीन तासानंतर तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी सायं. 6 वाजताच्या सुमारास पंचनामा करुन बॉडीला पोस्टमार्टमसाठी पाठविले.
बदलापुर पश्चिम रमेशवाडी येथील मेट्रो रेसिडेंसी पासुन बदलापुर गाव मुख्य पोलिस स्टेशन तसेच बैरेज रोड समर्थ चौक येथील पोलिस चौकी दोन्ही फार काही लांब नाही तरीही पोलिसांना तपास करण्यासाठी पोहोचण्यास तब्बल 3 तास उशीर झाल्याचे समजते. बिल्डरने घटनास्थळी भेट देऊन सर्व गोष्टी लवकरात लवकर कसे आटपता येईल हे पाहिल्याने एका मराठी कामगाराचा मृत्यु प्रकरण देखील शांतपणे दाबुन टाकले जाणार की काय अशी इमारतीचे काम करणारे कामगारांना आता शंका येत आहे.
वाचा - रेल्वेत भरती, विविध पदांकरिता निघाली भर्ती, 35 हजार पगार
वाचा - रेल्वेत भरती, विविध पदांकरिता निघाली भर्ती, 35 हजार पगार
यापुर्वी देखील बदलापुर पश्चिम रमेशवाडी येथील पनवेलकर बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा मृत्यु झाला, काही कामगारांनी बिल्डरविरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली होती परंतु या शहरात गोर गरिबांना वाली कुठे? काही दिवसानंतर तो प्रकरण दाबला गेला, तसेच आता मेट्रो रेसिडेंसी बिल्डरबाबतीत की करतात की काय अशी शंका वर्तवली जात आहे.

No comments