शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ताईज् किचन येथे "गुलाबजाम"
बदलापुरः- शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. श्री. बाळाराम पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैनरबाजी किंवा होर्डींगबाजी न करता वाढदिवसानिमित्त समाजकार्य म्हणुन ताईजॆ किचन येथे मिठाई म्हणुन गुलाबजाम देण्यात आले. ज्यामुळे आज ताईज् किचन मध्ये जेवण करणार्यांनी अल्पदरात जेवणासोबत गुलाबजामचा ही आस्वाद घेतला.
सध्या बदलापुरात हे अतिशय चांगले असे ट्रेंड नव्याने सुरु होत आहे. वाढदिवसानिमित्त धांगडधिंगा किंवा बैनरबाजी न करता बदलापुरातील समाजसेवक, राजकारणी मंडळी तसेच सामान्य नागरिक ताईज् किचन मध्ये एका दिवसाचे जेवण स्पॉन्सर करुन, राशन किंवा ताईज् किचन मध्ये लागणार्या सामग्री भेट म्हणुन देऊन आपला वाढदिवस साजरा करत आहेत. तरुणांचे आदर्श म्हणुन ओळखले जाणारे नगरसेवक - गटनेता कॅ. आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या अल्पदरात जेवण या संकल्पनेनंतर अनेक तरुणांच्या मनात "लोकांसाठी काहीतरी निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे" ही भावना निर्माण झाली असुन विविध सामाजिक उपक्रम तरुणांकडुन होतांना दिसत आहे.
मी खुप खुष आहे कारण मी जेव्हा राजकारणात प्रवेश करुन समाजसेवा करण्यास सुरुवात केली तेव्हा पासुन माझे स्वप्न होते की बदलापुर शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात तसेच समाजकारणात आपला सहभाग नोंदवावा तसेच तरुणांनी शहराच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, हे आता हळु हळु साकार होतांना दिसत आहे. बदलापुरातील अनेक तरुण मंडळी आता आपल्या वाढदिवसानिमित्त ढांगणढिंगा न करता वाम मार्गाला न लागता समाजसेवा म्हणुन विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत तसेच सहभाग ही घेत आहेत. आज शिक्षक आमदार मा. श्री. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी स्वतः ताईज् किचनला भेट देऊन आलेल्या प्रत्येकाला जेवणासोबत गुलाबजाम देऊन त्यांचा तोंड गोंड करण्याचा जो प्रयत्न केला ते खरोखरच प्रशंसनीय आहे असे कॅ. आशिष दामले यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
यापुर्वी बेलवली येथील समाजसेवक व युवाराज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त ताईज् किचन च्या समाजकार्याला हातभार म्हणुन दोन गॅस सिलेंडर भेट म्हणुन दिले होते.



No comments