मुरबाड येथील शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामाची चौकशी करण्याची मनसेची मागणी
मुरबाडः- मुरबाड शहर छ. शिवाजी महाराज चौकाचे पुन्हा एकदा सुशोभिकरणाचे काम ठेकेदारमार्फत होत असल्याने सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहराध्यक्ष नरेश देसले यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुरबाड तहसिलदार यांना पत्र दिले असुन त्यांत असे म्हटले आहे कि, मुरबाड शिवाजी चौकाचे काही महिन्यांपुर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते, त्यावेळी चारही बाजुला संरक्षणासाठी लोखंडी जाळी (ग्रील) बसविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा भव्य स्वरुपात सुशोभिकरण करत असतांना सदर ग्रीन काढुन टाकण्यात आले असुन इतके महागडे लोखंडी जाळी (ग्रीन) ठेकेदाराने केले काय असा प्रश्न विचारण्यात आला आहे. सदर ग्रीन कुठे आहे याचा शोध घेत संबंधीत ठेकेदार करत असलेल्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मनसे ने तहसिलदार यांना पत्र दिल्यानंतर छ. शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामातही ठेकेदार टक्केवारी व भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असल्याची शहरात चर्चा आहे.


No comments