Header Ads

  • ताजा खबरें

    प्रकल्पबाधित तरुण-तरुणींकरिता विमानतळासंबंधी अभ्यासक्रम

    सिडको तारा प्रशिक्षण केंद्राचा अभिनव उपक्रम 
    सिडको तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील प्रकल्पबाधित तरुण-तरुणींकरिता विमानतळासंबंधी विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम (कोर्सेस) सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये एअरलाईन रिझर्व्हेशन एजंट, एअरलाईन कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, एअरलाईन बॅगेज हॅन्डलर व एअरलाईन कार्गो एजंट या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
    सिडकोतर्फे सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून सन 2015 पासून सिडको तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातर्फे नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पबाधित तरुणांना नोकरी व महिलांना उद्योगांसाठी पूरक कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. विशेषत: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याबाबत सदर उपक्रम हा कमालीचा यशस्वी ठरला आहे.   
    उपरोक्त अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना विमानतळ प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यास्तव, प्रकल्पबाधित तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रमांसंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याकरिता सिडको तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, टॉवर नं. 5, प्लॅटफॉर्म स्तर, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, नवी मुंबई- 400 614 या पत्त्यावर भेट द्यावी किंवा 022-6105 4800/06/07/09/11 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 022-6105 4455 या क्रमांकावर कॉल सेंटरशी संपर्क साधावा.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad