सिप्राच्या अध्यक्षपदी दयानंद कांबळे यांची सर्वानुमते निवड
नवी दिल्ली, दि. 27 : महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची आज दिल्लीस्थित राज्य माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सिप्राच्या सर्वधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ही निवड करण्यात आली. येत्या आठवडयात कार्यकारणीच्या अन्य पदाधिका-यांची निवड करण्यात येणार आहे .
सिप्रा ही संघटना दिल्लीत जवळपास १५ वर्षांपासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांना राष्ट्रीय स्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांकडून शासनातील प्रभावी जनसंपर्कासाठी वापरण्यात येणारे विविध माध्यम यावर चर्चा करण्यात येते. विविध राज्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव व विचारांची देवान-घेवान करणे आदी काम सिप्रा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते.
सिप्राच्या सर्वसाधारण बैठकीत छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिमबंगाल, बिहार आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे दिल्लीस्थित अधिकारी उपस्थित होते.
No comments